औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगरच व्हावा, पण नाव बदलण्याने काय साध्य होणार? : अमोल कोल्हे

औरंगाबाद या शहराचा उल्लेख संभाजीनगरच व्हायला हवा. पण राज्यकर्ता म्हणून सर्वांगिण विकास व्हायलाच हवा, असं अमोल कोल्हे म्हणाले (Amol Kolhe on demand of change name of Aurangabad as Sambhajinagar).

औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगरच व्हावा, पण नाव बदलण्याने काय साध्य होणार? : अमोल कोल्हे
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 5:10 PM

मुंबई : “औरंगाबाद या शहराचा उल्लेख संभाजीनगरच व्हायला हवा. पण राज्यकर्ता म्हणून सर्वांगिण विकास व्हायला हवा. आपली अस्मिता आणि प्रतिकेच्या मागे किती धावायचं, नाव बदलण्याने काय साध्य होणार आहे? अस्मितेच्या प्रश्नाने मराठवाड्याचे प्रश्न थांबणार नाहीत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत”, अशी रोखठोक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी मांडली. मुंबई पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते (Amol Kolhe on demand of change name of Aurangabad as Sambhajinagar).

अमोल कोल्हे यांनी यावेळी विविध विषयांवर आपलं मत मांडलं. त्यांना मराठा आरक्षणाबाबत प्रश्न विचारला असता “मराठा आरक्षणाचा विषय हा न्यायप्रविष्ट आहे. या विषयी सरकार सातत्याने भूमिका मांडतं आहे. एबीसी आरक्षणाबाबात संसदेत जनगणनेत वेगळा कॉलम असायला हवा. जोपर्यंत संख्या समजणार नाही तोपर्यंत काही ठरवता येणार नाही. सध्या 52 टक्के आरक्षणापैकी 27 टक्केच आरक्षण आहे, त्यामुळे जनगणना महत्वाची आहे”, अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली (Amol Kolhe on demand of change name of Aurangabad as Sambhajinagar).

बिहारच्या विधानसभा निवडणुकीचा आज (10 नोव्हेंबर) निकाल जाहीर होणार आहे. याबबत कोल्हे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी राष्ट्रीय जनता दलचे नेते तेजस्वी यादव यांचं कौतुक केलं. “तेजस्वी यादव यांनी 31 व्या वर्षी जे काम केलंय ते वाखाणण्याजोगं आहे. त्यांचं कौतुक करतो. अनेक तरुणांना त्यांनी राजकारण्यात येण्यासाठी प्रोत्साहीत केलं आहे”, असं अमोल कोल्हे म्हणाले.

बिहारमध्ये आज मतमोजनी

दरम्यान, बिहारमध्ये सध्या मतमोजनी सुरु आहे. या मतमोजनीचा निकाल आज रात्री उशिरापर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत पूर्ण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या समोर आलेल्या आकडेवारीनुसार भाजप सर्वाधक 75 जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र आहे. तर भाजपचा मित्रपक्ष 42 जागांवर आघाडीवर आहे. आताच्या आकडेवारीनुसार भाजपप्रणित एनडीए बिहारमध्ये सत्ता स्थापन करण्यात यशस्वी होण्याची चिन्हं आहेत. मात्र, अजूनही संपूर्ण मतमोजनीचं काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत स्पष्टपणे काहीच सांगता येणार नाही.

बिहारमध्ये आज सकाळी आठ वाजता मतमोजनीला सुरुवात झाली. सुरुवातीच्या दोन-तीन तासांमध्ये महागठबंधनने 100 जागांवर उसंडी मारली होती. तर भाजप पिछाडीवर होते. मात्र, दुपारी 12 वाजेपर्यंत एनडीए 100 जागांच्या पुढे आघाडीवर दिसू लागली. या निवडणुकीत एनडीएला राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी कडवी झुंज दिली. त्यामुळे अमोल कोल्हे यांनी तेजस्वी यादव यांचं कौतुक केलं.

हेही वाचा : Bihar Election Result | बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री व्हावा, भाजप एससी मोर्चाच्या अध्यक्षांची मागणी

Non Stop LIVE Update
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.