अमरावती विभागात सरासरी 130 टक्के पाऊस, कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान? 

अमरावती विभागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. अमरावतीतील अकोला जिल्ह्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे.

अमरावती विभागात सरासरी 130 टक्के पाऊस, कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान? 
rain

अमरावती : राज्यात गेल्या आठवड्याभरापासून अनेक भागात ढगफुटीसदृश पाऊस कोसळत आहे. कोकणातील रत्नागिरी, रायगड भागात मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहत आहे. अमरावती विभागात सरासरी 130 टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे 9913.75 हेक्टरचे नुकसान झाले आहे. (Amravati division receives average of 130 percent rainfall Damage in many village)

अमरावती विभागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. अमरावतीतील अकोला जिल्ह्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. अमरावती विभागात सरासरी 130 टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे 9913.75 हेक्टरचे नुकसान झाले आहे. अमरावतीत 21 ते 23 जुलैदरम्यान अतिवृष्टी ते पुरामुळे नुकसान झाले आहे, याबाबतचा प्राथमिक अहवाल विभागीय आयुक्तांकडून सादर करण्यात आला आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस?

जिल्हा –         पाऊस – टक्केवारी

1) बुलडाणा – 354.9 मिमी – 125.9 टक्के

2) अकोला – 341.2 मिमी 112.8 टक्के

3) वाशिम – 498.4 मिमी 143.6 टक्के

4) अमरावती – 390.9 मिमी 111.2 टक्के

5) यवतमाळ – 510.6 मिमी 145.8 टक्के

कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान? 

1. अकोला – 5 तालुके – 6200 हेक्टर
2. वाशिम – 6 तालुके – 2671.8 हेक्टर
3. यवतमाळ – 5 तालुके – 780.30 हेक्टर
4. अमरावती – 3 तालुके – 261.60 हेक्टर

अकोल्यात मुसळधार 

अकोला शहरासह जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या धुव्वाधार पाऊस झाला आहे. यामुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शुक्रवारी पुन्हा जिल्हातल्या अकोला, मूर्तिजापूर, अकोट, तेल्हारा तालुक्यात पावसाचा तडाखा बसला आहे. तसेच अनेक तालुक्यातील गावांचा संपर्क तुटला असून तेल्हारा तालुक्यातील नाल्याला पूर आला आहे. त्यामुळे तेल्हारा-पाथर्डीमार्गे अकोट आणि तेल्हारा-वरवटचा संपर्क तुटला आहे.

लोकांच्या घरांमध्ये पाणी

अकोला जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती आणि पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच शहरात आणि ग्रामीण भागात नदी नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसाच्या पाण्याने जिल्हातील शेतीचे 4249 हेक्टर क्षेत्र खरडले आहे. सध्या या जिल्ह्यात पाऊस सातत्याने सुरु आहे. त्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

(Amravati division receives average of 130 percent rainfall Damage in many village)

संबंधित बातम्या :

Taliye landslide death toll : तळीये गाव होत्याचं नव्हतं झालं, 40 मृतदेह एका रांगेत, आख्खं गाव स्मशानात बदललं

VIDEO : “आई-वडील, भाऊ, भावजय, भावाचं अख्खं कुटुंब गेलं, माहेरचं स्मशान झालं”

माणसं बोंंबलली, मी बाहेर पडलो आणि होत्याचं नव्हतं झालं, तळीयेतील बबन सकपाळांची कहाणी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI