Amravati Young Sarpanch | 23 वर्षांची अंकिता झाली गाव कारभारी; गाव आदर्श करण्याचं स्वप्न

राज्यातील 14 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका मागील महिन्यात पार पडल्या (Amravati Shirala Village). आता गावागावात सरपंच निवडीला सुरुवात झाली आहे.

Amravati Young Sarpanch | 23 वर्षांची अंकिता झाली गाव कारभारी; गाव आदर्श करण्याचं स्वप्न
Amravati young Sarpanch

अमरावती : राज्यातील 14 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका मागील महिन्यात पार पडल्या (Amravati Shirala Village). आता गावागावात सरपंच निवडीला सुरुवात झाली आहे. गावचा सरपंच म्हणजे चांगला अनुभवी व्यक्ती, राजकारणात मुरलेला असावा. त्याचं वय त्याची प्रतिष्ठा हे सर्व बघितल्या जात असते. तरी अमरावती जिल्ह्यातील शिराळा या 18 हजार लोकवस्तीच्या गावाचा गाढा 23 वर्षाची उच्च शिक्षित असलेली अंकिता मिलींद तायडे ही तरुणी हाकणार आहे. नुकतीच तिची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे (Amravati Shirala Village 23 Year Old Ankita Tayade Became The Young Sarpanch).

अमरावती जिल्ह्यात 537 ग्रामपंचायतीसाठी निवडणुका पार पडल्या. आता सरपंच पदासाठी निवड सुरु झाली आहे. त्यामुळे गावागावात गटातटाचे राजकारण सुरु आहे. त्यासाठी गावातल्या गाव पुढार्‍यांनी राजकीय खेळी खेळायला सुरवात केली आहे. आपल्या गटाचा सरपंच कसा होईल, ग्रामपंचायत वर आपला झेंडा कसा फडकेल, यासाठी गावपुढाऱ्यांची कसोटी लागली असतानाच शिराळा गावातील अंकिता मिलिंद तायडे या 23 वर्षाच्या तरुणीची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे.

शिराळा ग्रामपंचायतीत 17 सदस्य

अमरावती शहरापासून अवघ्या 15 किलोमीटरवर शिराळा गाव आहे. या गावची लोकसंख्या 18 हजार आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतमध्ये एकूण 17 सदस्य आहेत. यावर्षी या ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदाचे आरक्षण हे अनुसूचित जाती जमातीसाठी निघाले होते. त्यामुळे अंकिता तायडे हिची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

उच्चशिक्षित सरपंच

अंकिता तायडे ही उच्चशिक्षित असून तिचे शिक्षण एमएससी झाले आहे. त्यामुळे माझे शिक्षण माझ्या गावाच्या विकासासाठी नक्कीच कामी येईल. माझं शिक्षण पाहून गावातील लोकांनी मला निवडून दिले आहे. माझ्याकडूनही त्यांना खूप अपेक्षा आहेत. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करुन माझं शिराळा गाव कसं आदर्श होईल, महाराष्ट्रात माझ्या गावाला एक वेगळी ओळख कशी मिळेल, यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार असल्याच नवनिर्वाचित सरपंच अंकिता तायडे यांनी सांगितले.

“अवघ्या 23 वर्षांची आमच्या गावची अंकिता ही आमच्या गावाचे नेतृत्व करीत आहे. एक महिला तेही कमी वयात सरपंच पदी नियुक्त झाल्यामुळे आम्हाला तिचा अभिमान आहे. अंकिताने आता गावातील महिलांसाठी विविध योजना राबवाव्यात”, असं मत गावातील महिलांनी व्यक्त केलं आहे.

अंकिता सरपंच झाल्याने महिलांमध्ये नवचेतना निर्माण झाली आहे. आपल्या गावचा कायापालट होणार अशी भाबडी आशा गावकऱ्यांना लागली आहे. निश्चित येणाऱ्या काळात अंकिता कसा गावचा विकास करणार हे येणारा काळ ठरविणार आहे.

Amravati Shirala Village 23 Year Old Ankita Tayade Became The Young Sarpanch

संबंधित बातम्या :

कोल्हापूर जिल्ह्यातील 6 तालुक्यातील सरपंच निवडीचा मार्ग मोकळा, उपजिल्हाधिकाऱ्यांकडून कार्यक्रम जाहीर

जयदत्त क्षीरसागरांचा विजयाचा गुलाल, बीडमध्ये 19 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे सरपंच-उपसरपंच

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI