Khadial village water crises : मेळघाटात एक बादली पाणी मिळवण्यासाठी जीवघेणा संघर्ष ; जीव धोक्यात मिळवत आहेत पाणी

गावातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडून कोरड्या विहीरीत टँकरचे पाणी सोडण्यात येत आहे. मात्र आपल्याला पाणी मिळेल की नाही या चिंतेपोटी नागरिक विहिरीच्या कठड्यावर धोकादायक पद्धतीनं उभे राहत टँकर मधून पडणारे पाणी उपसत आहे.

Khadial village water crises : मेळघाटात एक बादली पाणी मिळवण्यासाठी जीवघेणा संघर्ष ; जीव धोक्यात मिळवत आहेत पाणी
Khadial village water crises Image Credit source: ANI
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 10:18 AM

अमरावती- महाराष्ट्र जून महिना उडजाडला तरी पावसाची (Rain) कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. दुसरीकडं राज्याच्या काही भागात पाण्याच्या मोठा प्रमाणात तुटवडा निर्माण झाला असून. नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. अनेक ठिकाणी नागरिक आपला जीव धोक्यात घालून हंडाभर पाणी मिळवण्याचा पर्यटन करताहेत.मेळघाटतही पाण्याचा मोठा दुष्काळ(Drought)  जाणवत आहे. मेळघाटातील खडियाल ( Khadial village)गावातील लोक एक बादली पाण्यासाठी जीव धोक्यात घालताना दिसून आले आहेत. या गावाची लोकसंख्या 1500 एवढी असून या रागावता केवळ दोनच विहिरी आहे.मात्र त्याही कोरड्या पडल्या आहेत. गावाला दररोज 2-3 टँकरच्या पाण्यावर दिवस काढावा लागत असल्याचे समोर आले आहे.

दूषित पाण्याचा पुरवठा

गावातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडून कोरड्या विहीरीत टँकरचे पाणी सोडण्यात येत आहे. मात्र आपल्याला पाणी मिळेल की नाही या चिंतेपोटी नागरिक विहिरीच्या कठड्यावर धोकादायक पद्धतीनं उभे राहत टँकर मधून पडणारे पाणी उपसत आहे. यामध्ये मोठी दुर्घटना घडण्याची शक्यताही व्यक्त केली जाते आहे. टँकरद्वारेपुरवठा करण्यात येणारे पाणी शुद्ध नसल्याची तक्रारही गावकऱ्यांनी केली आहे. दूषित पाणी पिल्याने गावात आजार वाढत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

महिला विहिरीत तोल जाऊन पडली

गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिकमधील पेठ तालुक्याच्या बोरी गावात पाणी भरण्यासाठी गेलेली महिला तोल जाऊन विहिरीत पडली होती. यावेळी स्थानिकांनी विहिरीत उतरून महिलेचे प्राण वाचवले होते. यापूर्वी नाशिकच्या ग्रामीण महिलानींही पाण्यासाठी रस्ते बंद आंदोलन केले होते. पाण्यासाठी मजुरी बुडत असल्याची माहिती महिलांनी दिली आहे. पाण्यासाठी महिलांना कामधंदा सोडून वणवण भटकावे असल्याचे त्यांनी म्हटले होते. यामुळे पुन्हा एकदा महिलांची पाण्यासाठी वणवण, जीवघेणा संघर्ष कधी थांबणार?

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.