भाजपचे आमदार प्रवीण पोटे यांना अटक, पोलिसांनी 10 कार्यकर्त्यांनाही घेतला ताब्यात, अमरावती हिंसाचार प्रकरण

अमरावती शहरात इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली. त्यामुळं विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास अडथळा निर्माण होत आहे. राज्य सरकारने अमरावती शहरात काश्मीरसारखी परिस्थिती निर्माण केली आहे, असा आरोप भाजपच्या वतीनं लावण्यात आलाय.

भाजपचे आमदार प्रवीण पोटे यांना अटक, पोलिसांनी 10 कार्यकर्त्यांनाही घेतला ताब्यात, अमरावती हिंसाचार प्रकरण
अमरावतीत भाजप आमदार प्रवीण पोटे यांचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण
Follow us
| Updated on: Nov 17, 2021 | 2:43 PM

अमरावती : शहरातील हिंसाचार प्रकरणी माजी राज्यमंत्री व भाजपाचे विद्यमान आमदार प्रवीण पोटे यांना अमरावती शहर पोलिसांनी अटक केली. प्रवीण पोटे यांनी अमरावती बंदचे आवाहन केले होते. पोलिस आपल्याला अटक करतील, असे त्यांना वाटले. त्यामुळे स्वतः अटक करवून घेतली. प्रवीण पोटे यांच्यासोबत भाजपाच्या आणखी 10 कार्यकर्त्यांनी अटक करून घेतली आहे.

अमरावती शहरात इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली. त्यामुळं विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास अडथळा निर्माण होत आहे. राज्य सरकारने अमरावती शहरात काश्मीरसारखी परिस्थिती निर्माण केली आहे, असा आरोप भाजपच्या वतीनं लावण्यात आलाय.

अमरावती बंदचे आवाहन केल्यानंतर पोलीस काल त्यांना अटक करण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. परंतु, ते घरी नव्हते. पोटे काल मुंबईत होते. आज अमरावतीत आल्यानंतर पोलीस आपल्याला अटक करतील, असे त्यांना वाटले. त्यामुळं त्यांनी स्वतः अटक करवून घेतली. त्यांच्यासोबत इतर 10 कार्यकर्तेही आहेत.

इंटरनेटसाठी विद्यार्थी जातात शहराबाहेर

अमरावती शहरात शनिवारी हिंसाचार उफाळला होता. त्यानंतर अमरावती शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून इंटरनेट सेवा बंद आहे. इंटरनेटवरील चालणारे आर्थिक व्यवहार व इतर व्यवसाय बंद झाले आहे. त्यामुळे इंटरनेटच्या शोधात अमरावतीमधील तरुण व विद्यार्थी शहराबाहेर 7 किलोमीटर दूर आले आहे. शहराबाहेर इंटरनेट मिळत असल्याने अमरावती नागपूर हायवेलगत मोठ्या प्रमाणावर गर्दी इंटरनेटसाठी होत आहे.

भाजीपाल्याच्या किमतींमध्ये वाढ

इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याने त्याचा परिणाम बँकांवरही झाला आहे. सोबतच संचारबंदीमुळे शहरातील सर्वच बँका दोन दिवस बंद राहिल्या. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील दोन्ही दिवसांचे सुमारे १०० कोटींचे व्यवहार ठप्प पडले. शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया येथूनच जिल्ह्याच्या विविध भागात रकमेचे आदान प्रदान होत असते. मात्र शहरातील सर्व बँकाच बंद राहिल्याने कोणतीही आर्थिक उलाढाल झाली नाही. या सोबत भाजी मार्केट ही गेल्या चार दिवसांपासून बंद असल्याने भाज्यांच्या किंमतीमध्ये तिप्पट वाढ झाली आहे.

नागपुरात जमावबंदी असताना शरद पवार यांच्या सभेला परवानगी कशी?; रविकांत तुपकर यांचा सवाल

पुणे म्हाडाच्या लॉटरीत अर्ज करताय? वाचा मुख्य शहरातून म्हाडाचे प्रकल्प किती अंतरावर

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.