Video : Amravati Encroachment : अमरावतीतील अतिक्रमण हटाव मोहीम, प्रवीण पोटे-मनपा अधिकारी आमनेसामने, व्यापारीही संतप्त

मनपाचे अधिकारी म्हणतात, आधी सूचना दिली होती. सार्वजनिक जागेवरील अतिक्रमण हटवा, असं सांगितलं होतं. याठिकाणी अपघात होतात. सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतो. वाहतुकीची समस्या निर्माण होते.

Video : Amravati Encroachment : अमरावतीतील अतिक्रमण हटाव मोहीम, प्रवीण पोटे-मनपा अधिकारी आमनेसामने, व्यापारीही संतप्त
प्रवीण पोटे-मनपा अधिकारी आमनेसामनेImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Jul 16, 2022 | 9:00 PM

अमरावती : शहरातील बाजारपेठेतील (City market) अतिक्रमण काढण्यावरून भाजप आमदार प्रवीण पोटे आणि मनपा अतिक्रमण अधिकारी (Municipal Officers) यांच्या खडाजंगी झाली. गेल्या दोन दिवसांपासून शहरात बाजारपेठमधील अतिक्रमणाची कारवाई सुरू आहे. प्रवीण पोटे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मी अडथळा निर्माण करतो म्हणून माझ्याविरोधात 353 चा गुन्हा दाखल करा, असंही प्रवीण पोटे (Praveen Pote) म्हणाले. दोन दिवसांपूर्वी तुम्हाला पत्र द्यायला हवं होतं, असं पोटे यांनी मनपा अधिकाऱ्यांना सांगितलं. वाईन बार वाचविण्यासाठी आले तुम्ही, असा आरोप एकानं पोटे यांच्यावर केला. तेव्हा बाईनबारवाले काही माझे नातेवाईक नसल्याचं पोटे म्हणाले. मनपाचे अधिकारी म्हणतात, आधी सूचना दिली होती. सार्वजनिक जागेवरील अतिक्रमण हटवा, असं सांगितलं होतं. याठिकाणी अपघात होतात. सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतो. वाहतुकीची समस्या निर्माण होते. त्यामुळं अतिक्रमण हटविल्याचं अधिकारी म्हणतात.

मनपाविरोधात व्यापारीही संतप्त

अतिक्रमण काढणे सुरू असल्याने व्यापारी आक्रमक झालेत. सुरुवातीला राजकमल चौक ते गांधी चौकापर्यंतचे अतिक्रमण हटविण्यात आले. आज दुपारी बारा वाजताच्या सुमारास बापट चौकातील अतिक्रमण हटविण्यात आले. व्यापारी म्हणाले, आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही आधीच अतिक्रमण हटविलं असतं. पण, वेळेवर येऊन अतिक्रमण काढणं चुकीचं आहे. मनपाचे अधिकारी अरेरावी करत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला. सांगूनही ते ऐकत नाहीत.

हे सुद्धा वाचा

वेळ मागूनही प्रशासनाचा नकार

सुरुवातीला सांगितलं असत तर येवढं नुकसान झालं नसतं, असा दावा व्यापाऱ्यांनी केला. आमची 25 ते 30 वर्षांपासून इथं दुकानं आहेत. स्टे ऑर्डर आमच्याकडं आहे. आम्हाला माल काढण्यासाठी दोन-चार तास वेळ द्या. आम्ही आमच्या दुकानातील माल बाहेर काढतो. म्हणजे नुकसान कमी होईल, असं प्रशासनाला सांगूनही ते ऐकत नसल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केलाय. अतिक्रमण हटाव मोहिमेमुळं शहरातील वातावरण चांगलेच तापले होते. पोटे हेही संतापले होते. यामुळं मनपाचे अधिकारी आणि पोटे यांच्यात चांगलीच खडाजंगी उडाली.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.