Video Amravati Leopard : अमरावती विद्यापीठात बिबट्याचा वावर, कुत्र्यांना घाबरून भिंतीवरून उडी, सीसीटीव्हीत घटना कैद

गेटच्या आतमध्ये बिबट्या दिसतो आहे. तो इकडं तिकडं फिरत आहे. त्यानंतर तो भिंतीवर उभा राहून बाहेर बघत आहे. पण, त्याला बाहेर पडता येत नाही. त्यानंतर तो भिंतीवर चढतो. तिथून खाली झेप घेतो. गेटच्या बाहेर काही कुत्रे त्याच्यावर भुंकतात. त्यामुळं बिबट त्यांना घाबरून पुन्हा गेटच्या आत उडी मारतो. भिंतीवर चढतो. भिंतीवरून उडी मारून पळ काढतो.

Video Amravati Leopard : अमरावती विद्यापीठात बिबट्याचा वावर, कुत्र्यांना घाबरून भिंतीवरून उडी, सीसीटीव्हीत घटना कैद
अमरावती विद्यापीठात बिबट्याचा वावर
Follow us
| Updated on: Jul 02, 2022 | 5:14 PM

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ (Amravati University) परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यातच विद्यापीठात लगत असणाऱ्या गुरुकृपा कॉलनी (Gurukrupa Colony) येथील दादाराव चांदणे यांच्या घराच्या आवारात बिबट शिरला. घराच्या आवारात बिबट शिरल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. घरापर्यंत बिबट पोचल्यामुळे विद्यापीठ लगतच्या परिसरात खळबळ उडाली आहे. घराच्या कुंपणाची भिंत ओलांडून या बिबट्याने घराच्या आवारात प्रवेश केला. यावेळी दोन कुत्रे बिबट्या मागे धावल्यामुळे त्याने फाटकावरुन उडी मारुन थेट रस्ता ओलांडला. अन् विद्यापीठाच्या भिंतीवरुन (University Wall) बिबट्या उडी मारुन पसार झाला.

पाहा व्हिडीओ

नेमकं काय दिसतं

गेटच्या आतमध्ये बिबट्या दिसतो आहे. तो इकडं तिकडं फिरत आहे. त्यानंतर तो भिंतीवर उभा राहून बाहेर बघत आहे. पण, त्याला बाहेर पडता येत नाही. त्यानंतर तो भिंतीवर चढतो. तिथून खाली झेप घेतो. गेटच्या बाहेर काही कुत्रे त्याच्यावर भुंकतात. त्यामुळं बिबट त्यांना घाबरून पुन्हा गेटच्या आत उडी मारतो. भिंतीवर चढतो. भिंतीवरून उडी मारून पळ काढतो.

बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी

बिबट्या विद्यापीठ परिसरात आल्यानं तो काय शिकायला आला होता का, असा उपहास केला जात आहे. पण, काहींच्या मनात भीती निर्माण झाली आहे. असाच बिबट्याचा वावर असल्यास घराबाहेर कसं पडायचं, असं स्थानिकांच म्हणणय. या बिबट्याचा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शोध घेऊन त्याला जेरबंद करावे, अन्यथा काही दुर्घटना झाल्यास वनविभाग जबाबदार असेल, असा इशारा दिला आहे.

कुत्रे ठरले पॉवरफूल

बिबट्या दिसताच कुत्रे भुंकू लागले. तीन-चार कुत्रे पाहून बिबट्या घाबरला. त्यानंतर तो पळून गेला. या कुत्र्यांच्या टोळीचा सामना करणं काही सोपं काम नाही, असं त्याला वाटलं असेल.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.