मनात आलं असतं तर शाहरुख, सलमानलाही घेतलं असतं, अमृता फडणवीसांचं सविस्तर स्पष्टीकरण

मंत्री नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस तसेच भाजपवर गंभीर आरोप केलाय. त्यांचे ड्रग्ज पेडलर्सशी जवळचे संबंध असल्याचे वक्तव्य केलंय. त्यांनी फडणवीस यांच्या पत्नी अमृता पडणवीस यांचा फोटोदेखील ट्विट केला आहे. या प्रकारानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या या आरोपांना फडणवीस यांच्या पत्ती अमृता फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन फेटाळून लावले.

मनात आलं असतं तर शाहरुख, सलमानलाही घेतलं असतं, अमृता फडणवीसांचं सविस्तर स्पष्टीकरण
amruta fadnavis
Follow us
| Updated on: Nov 01, 2021 | 8:34 PM

मुंबई : मंत्री नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस तसेच भाजपवर गंभीर आरोप केलाय. त्यांचे ड्रग्ज पेडलर्सशी जवळचे संबंध असल्याचे वक्तव्य केलंय. त्यांनी फडणवीस यांच्या पत्नी अमृता पडणवीस यांचा फोटोदेखील ट्विट केला आहे. या प्रकारानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. मलिक यांनी केलेले सर्व आरोप फडणवीस यांच्या पत्ती अमृता फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन फेटाळून लावले आहेत. “मी राजकारणी नाही, समाजसेविका आहे. जेव्हा आम्ही मुंबईला आलो तेव्हा रिव्हर मार्च ही मोहीम चालवणाऱ्यांनी माझ्याशी संपर्क साधला. सचिन गुप्ता आणि जयदीप राणा यांना आऊटसोअर्स करण्यात आलं. हे दिग्दर्शक आणि अशिस्टंट होते. या दोघांनी याआधी सदगुरु यांच्यासाठी गाणं तयार केलं होतं. त्या गाण्यासाठी कोणीही पैसा घेतलेला नाही. मनात आलं असतं तर शाहरुख, सलमानलाही घेतलं असतं,” रोखठोक प्रत्युत्तर अमृता फडणवीस यांनी मलिक यांना दिलंय.

त्या गाण्यात कोळी बांधव, डेबवाले, कोणीही पैसे घेतले नाही

“माझा संपर्क रॅली फॉर रिव्हर्स ही मोहीम राबवणारे सदगुरु यांच्याशी झाला. सदगुरु यांच्या मोठ्या कार्यक्रमात मी सहभागी झाले होते. तेथे मी एक वक्ता होते. त्यानंतर सदगुरु यांच्यासोबत सचिन गुप्ता आणि जयदीप राणा यांना आऊटसोअर्स करण्यात आलं. हे दिग्दर्शक आणि अशिष्टंट होते. या दोघांनी सदगुरु यांच्यासाठी गाणं तयार केलं. या गाण्यावर सर्व बॉलिवूडने गाणं म्हटलं. हे गाणं रिव्हर्र मार्चवाल्यांना आवडलं. याच दोघांना नंतर रिव्हर मार्चने आऊटसोअर्स केलंसचिन गुप्ता यांनी दिग्दर्शन केलं तर रॅली फॉर रिव्हर मार्चवाल्यांनी सर्व रेकॉर्डिंग फ्रीमध्ये ठेवलं. कोणीही या गाण्यासाठी पैसा घेतला नाही. या गाण्यात शाहरुख, सलमान यांना आणलं असतं पण यामध्ये कोळी बांधव,डेबवाले आहेत. मला तसेच रिव्हर मार्चच्या लोकांमध्ये राजकीय महत्वाकांक्षा नाही, असे स्पष्टीकरण अमृता फडणवीस यांनी दिले.

बिगडे नवाबची एनर्जी सुधरे नवाबमध्ये कन्व्हर्ट करा

तसेच पुढे बोलताना अमृता फडणवीस यांनी मलिक यांनी फोटो ट्विट करुन केलेले आरोप निराधार असल्याचे सांगितले. “आम्ही जागृती केली आणि आज आम्हालाच लाथ मारली जाते. आम्हाला कोणतीही राजकीय अभिलाषा नाही. त्यांच्या मागे हात धुवून लागलात हे कोणतं राजकारण आहे. तुम्हाला राजकारण करायचं आहे.बिगडे नवाब व्हायचं आहे ?  तुम्ही बिगडे नवाबची एनर्जी सुधरे नवाबमध्ये कन्व्हर्ट करा. तरच महाराष्ट्र पुढे जाऊ शकतो,” असा सल्ला अमृता फडणवीस यांनी मलिक यांना त्यांचे नाव न घेता दिला.

नवाब मलिक यांनी नेमके कोणते आरोप केले ?

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठा आरोप करून एकच खळबळ उडवून दिली. जयदीप राणाचा मी फोटो आज ट्विट केला. जयदीप राणा हा सध्या जेलमध्ये बंद आहे. जयदीप राणा 2020 दिल्लीच्या केसमध्ये सध्या जेलमध्ये बंद आहे. ड्रग्ज ट्रॅफिकिंगच्या प्रकरणात त्याला अटक झाली आहे. पण, त्यांचे संबंध महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यासोबत आहेत. फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नदी स्वच्छता मोहीमेविषयी गाणं केलं होतं. त्यात सोनू निगम आणि फडणवीसांच्या पत्नी यांनी गाणं गायलं होतं. फडणवीसांनी, सुधीर मुनगंटीवारांनी अभिनय केला होता. त्या गाण्याचे फायनान्स हेड जयदीप राणा होते. देवेंद्र फडणवीस आणि जयदीप राणाचे जवळचे संबंध आहेत, असा दावा मलिकांनी केला. इतकंच नाही तर गणपतीच्या दर्शनासाठी फडणवीस आणि जयदीप राणा हे एकत्र दिसत असल्याचा फोटो आहेत, असं सांगून त्यांनी खळबळ उडवून दिली.

इतर बातम्या :

लज्जास्पद! मोहम्मद शमीला पाठिंबा दिला म्हणून विराटच्या 10 महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्काराच्या धमक्या? नेटीझन्स संतापले

Deglur By Election : देगलूरला नवा आमदार मिळणार का? यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये काय घडलं?

मुंबईत नियम धाब्यावर बसवत प्रभाग फेररचना, भाजपचा आरोप; गांधीगिरी आंदोलनातून निषेध

(amruta fadnavis denied all allegations made by nawab malik on jaydeep rana neeraj gunde)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.