‘सिर्फ कुछ दाग अच्छे लगते है’, अमृता फडणवीसांचं नवं ट्विट

'सिर्फ कुछ दाग अच्छे लगते है', अमृता फडणवीसांचं नवं ट्विट

अमृता फडणवीस यांचा काल (9 एप्रिल) वाढदिवस होता (Amruta Fadnavis share her birthday celebration photo on social media).

चेतन पाटील

|

Apr 10, 2021 | 4:47 PM

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमी त्यांच्या वेगवेगळ्या ट्विटमुळे चर्चेत येत असतात. यावेळी देखील त्यांनी पुन्हा एकदा ट्विट केलं आहे. यावेळी त्यांनी ट्विटसोबत त्यांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्यांच्या चेहऱ्यावर केक लावण्यात आला आहे. या फोटोला अमृता यांनी ‘सिर्फ कुछ दाग अच्छे लगते है’, असं कॅप्शन दिलं आहे (Amruta Fadnavis share her birthday celebration photo on social media).

अमृता फडणवीस यांचं ट्विट

खरंतर अमृता फडणवीस यांचा काल (9 एप्रिल) वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्ताने त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिला. याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर सर्वांचे आभार मानले आहेत. अमृता यांनी त्यांच्या कुटुंबासोबत वाढदिवस साजरा केल्याची शक्यता आहे. कारण त्यांनी सेलिब्रेशनसी संबंधित फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्यांच्या चेहऱ्यावर ठिकठिकाणी केकचे ठिपके ठेवलेले दिसत आहेत. हा फोटो त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर आणि फेसबुक या दोन्ही अकाउंटवर शेअर केला आहे (Amruta Fadnavis share her birthday celebration photo on social media).

अमृता फडणवीस यांचा ट्विटरवरुन उद्धव ठाकरेंवर निशाणा

अमृता फडणवीस ट्विटरवर वारंवार शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधतात. दोन दिवसांपूर्वी राज्यात रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणि कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा यावरुन राजकीय वातावरण पेटलेलं असताना अमृता यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता हिंदीत निशाणा साधला होता. “पहचान कौन? एक राजा जो- महल की चौखट से निकलता नही अवाम से कभी मिलता नही सत्य और कर्म की राह पर चलता नही वसूली के बिन उसका पत्त्ता हिलता नही महामारी का कहर उससे सम्हलता नही प्रगति का फूल उसकी छाया में खिलता नही ! सच है, धोखा कभी फलता नही। क्या आपका खून ऐसे राजा को देख खौलता नही?”, असं ट्वीट अमृता फडणवीस यांनी केलं होतं.

हेही वाचा : क्या आपका खून ऐसे राजा को देख खौलता नही? अमृता फडणवीसांचं मुख्यमंत्री ठाकरेंवर ट्विट

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें