भुकेने व्याकूळ वासराला कुत्रीने दूध पाजलं!

भुकेने व्याकूळ वासराला कुत्रीने दूध पाजलं!

पुणे : आईचं प्रेम हे प्रेम असतं. मग ते मनुष्यांमध्ये असो किंवा प्राण्यांमध्ये.. पुणे जिल्ह्यातल्या शिरुर शहरात असंच एक उदाहरण समोर आलंय. इथे चक्क भुकेने व्याकूळ झालेल्या गायीच्या वासराला कुत्रीने दुध पाजलं. हा क्षण सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारा होता. यातून प्राण्यांमधील आईच्या ममत्वाचे दर्शन घडले आहे.

शिरुर शहरात एका भटक्या गाईने चाऱ्याच्या शोधात प्लास्टिक गिळलं होतं. त्यामुळे ही गाय जीवाच्या आकांताने ओरडत असताना एका ठिकाणी तडफडत पडली होती. आईच्या या आकांतेत गाईचं वासरु मात्र मागेमागे फिरत होतं.

या सर्व परिस्थितीत वासरु भुकेने व्याकूळ होऊन ओरडत होतं. या वासराची भूकेची हाक शेवटी एका भटक्या कुत्रीच्या कानी पडली आणि भुकेने व्याकूळ झालेल्या वासराला मातृत्वाच्या नात्याने दूध पाजले.

मुक्या प्राण्यांमध्येही मातृत्वाची ममता म्हणजे काय असते याचा आदर्श घालून देणारी ही घटना पाहायला मिळाली. शिरुर शहरातील नागरिकांनीही या गायीवर तातडीने वैद्यकीय उपचार करून या गायीचे प्राण वाचवले. कुत्रीच्या ममतेची आणि गोमातेचे प्राण वाचविणाऱ्या तरुणाईची चर्चा सध्या शिरुरमध्ये सर्वत्र होत आहे.

पाहा व्हिडीओ :

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI