अज्ञाताने नगरमध्ये संत भगवानबाबांच्या मूर्तीचा भाग जाळला

अहमदनगर : अज्ञात समाजकंटकाने संत भगवान बाबा यांच्या मूर्तीचा काही भाग जाळल्याची घटना अहमदनगरमध्ये घडली. शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या स्टुडिओत या मूर्तीचं काम सुरु आहे. शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी पारनेर पोलिसात याबाबत फिर्याद दाखल केली आहे. आरोपीला अटक करण्यासाठी नागरिक आक्रमक झाले आहेत. प्रमोद कांबळे यांनी पारनेर पोलीस स्टेशन येथे स्वप्निल शिंदे याच्यावर गुन्हा दाखल …

अज्ञाताने नगरमध्ये संत भगवानबाबांच्या मूर्तीचा भाग जाळला

अहमदनगर : अज्ञात समाजकंटकाने संत भगवान बाबा यांच्या मूर्तीचा काही भाग जाळल्याची घटना अहमदनगरमध्ये घडली. शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या स्टुडिओत या मूर्तीचं काम सुरु आहे. शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी पारनेर पोलिसात याबाबत फिर्याद दाखल केली आहे. आरोपीला अटक करण्यासाठी नागरिक आक्रमक झाले आहेत. प्रमोद कांबळे यांनी पारनेर पोलीस स्टेशन येथे स्वप्निल शिंदे याच्यावर गुन्हा दाखल केला असून कलम 379 चोरी करणे, 427 तोडफोड करणे, 435 कच्चा माल जाळपोळ करणे आदी कलम लावण्यात आले आहेत.

नगर येथील भाळवणीला शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या स्टुडिओमध्ये संत भगवानबाबा यांच्या मूर्तीचं काम सुरु होतं. मात्र त्या मूर्तीचा तयार झालेल्या काही भाग अज्ञात इसमाने स्टुडिओतून बाहेर शेतात आणून जाळल्याची घटना घडली. या कृत्यामुळे खळबळ उडाली आहे. ज्या ठिकाणी हा स्टुडिओ आहे त्या जागेचा मालक स्वप्नील शिंदे यानेच हा भाग जाळल्याचा आरोप प्रमोद कांबळे यांनी केलाय. मात्र शिंदेशी आम्ही संपर्क केला असता त्याने फोन उचलला नाही. पोलिसांनीही अजून शिंदेबाबत काही माहिती दिलेली नाही.

संत भगवान बाबांच्या मूर्तीची विटंबना केल्यामुळे भाविक संतप्त झाले आहेत. नगरमध्ये केडगाव बाह्य वळण रस्त्यावर भाविकांकडून रास्ता रोको करुन या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. पोलिसांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी भाविकांनी केली आहे.

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते दसरा मेळाव्याच्या दिवशी भगवान बाबा यांचं जन्मगाव सावरगावात भव्य मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. मूर्तीचा समोरील भाग तयार होता. पण मागच्या भागाच्या फिनिशिंगंच काम नगरमध्ये सुरु होतं. प्रमोद कांबळे हे काम करत असतानाच हा प्रकार घडलाय.

वीज बिल न भरल्यामुळे विकृतपणा?

काही दिवसांपूर्वी लागलेल्या आगीत प्रमोद कांबळे यांचा स्टुडिओ जळाला होता. त्यानंतर त्यांनी भाळवणी येथे त्यांच्या मुलाचा मित्र निखिल शिंदे यांच्या जागेवर भगवान बाबांच्या मूर्तीचं काम सुरु केलं. या जागेवर शिंदेचा प्लास्टिकचा कारखाना होता. जागेचं भाडं नको, फक्त अर्ध वीज बिल भरा, असं सांगून शिंदेने जागा दिली होती. प्लास्टिक बंदीमुळे दोन महिने हा कारखाना बंद होता. कांबळे यांनी निखील यांचा भाऊ स्वप्निल शिंदेला वीज बिलाचे 1 लाख 16 हजार रुपये दिले. पण स्वप्निल शिंदेने आणखी दीड लाख रुपयांची मागणी केली. काम पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम देतो असं कांबळे यांनी सांगितलं. काही वेळानंतरच मूर्तीचा भाग जळालेल्या अवस्थेत बाजूच्या शेतात आढळून आला, असं एफआयआरमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, मूर्ताचा भाग जाळण्याचा प्रयत्न केल्यानंतरही शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी उर्वरित काम युद्धपातळीवर पूर्ण केलं. सावरगावला मूर्ती बसवण्यात येणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *