गणेश विसर्जनाला गालबोट, 8 जणांचा मृत्यू, 5 जण बेपत्ता

मुंबई, पुण्यासह राज्यभरात 8 गणेशभक्तांचा मृत्यू झाला आहे. तर 5 जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.

गणेश विसर्जनाला गालबोट, 8 जणांचा मृत्यू, 5 जण बेपत्ता
Follow us
| Updated on: Sep 12, 2019 | 11:35 PM

मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई, पुणे, अमरावती, नागपूर यांसह राज्यात ठिकठिकाणी गणेश विसर्जनचा (Anant Chaturdashi) उत्साह पाहायला मिळत आहे. अनंत चतुर्दशीनिमित्त (Anant Chaturdashi 2019) आपल्या लाडक्या गणरायला निरोप देण्यासाठी भक्तांचा जनसागर समुद्रकिनाऱ्यांवर लोटला आहे. मात्र उत्साहाच्या आणि आनंदाच्या क्षणी गणेश विसर्जनादरम्यान काही ठिकाणी अघटित घटना घडल्याने विसर्जनाला गालबोट लागले आहे.

दरम्यान मुंबई, पुण्यासह राज्यभरात 8 गणेशभक्तांचा मृत्यू झाला आहे. तर 5 जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई :

मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर गणपती विसर्जनासाठी भक्तांची गर्दी उसळली आहे. मुंबईतील जूहू चौपाटीवर 9 वर्षांचा मुलगा हरवला आहे. कृष्णा राजभर असे या मुलाचे नाव आहे. बोरीवली पश्चिम आय सी खाडी परिसरात राहणार आहे. हा मुलगा आपल्या कुटुंबातील 11 लोकांसोबत गणपती पाहायला गेला होता.

शहापूर :

गणपती विसर्जनासाठी गेलेल्या एका मुलाचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. शहापूर तालुक्यातील कुंडन गावाच्या हद्दीत असलेल्या नदीत तोल जाऊन 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. कल्पेश प्रकाश जाधव (15) असे मृत मुलाचे नाव आहे. कल्पेश हा कुंडन गावातील कातकरी वाडी येथील राहणारा होता.

सिंधुदुर्ग :

गणपती विसर्जनादरम्यान मालवण-आचरा येथे गणपती विसर्जन करताना दोन जण समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रशांत तावडे आणि संजय परब अशी दोघांची नावे आहेत. हे दोघेही बुडत असताना जीव रक्षकांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले. पण या दोघांनी एकमेकांना मिठी मारली असल्याने ते दोघेही बुडाले.

बेळगाव :

बेळगावातील खानापूर तालुक्यातील जांबोटी भागातील बेटगीरी गावात गणपती विसर्जनासाठी गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सागर पांडुरंग गुरव (16) ओमकार रामलींग सुतार (22) अशी मृत्यू झालेल्या दोन तरुणांची नावे आहे. यामुळे बेटगीरी गावावर शोककळा पसरली आहे .

शिर्डी : 

शिर्डीतील श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूरमध्ये गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करताना एक तरुण वाहून गेला आहे. सौरभ विठ्ठल कर्डीले (18) असे या मुलाचे नाव आहे. सध्या सौरभला शोधण्याची शोधकार्य सुरु आहे.

अमरावती :

भातकुली तालुक्यातील वाठोडा शुकलेश्वर या ठिकाणी गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेले 4 जण बेपत्ता झाले आहेत. सध्या गावकऱ्यांच्या आणि पोलिसांच्या मदतीने सध्या शोधकार्य सुरु आहे. नदीच्या पात्रामध्ये गणपती विसर्जन करीत असताना बेपत्ता झाली आहेत. सतीश अजाबराव सोळंके (28), ऋषिकेश बाबुराव वानखडे (22), संतोष बारीकराव वानखडे (45), सागर अरुण शेंदुरकर (20) अशी बेपत्ता असलेल्या चौघांची नावे आहेत.

वर्धा :

गणपती विसर्जनासाठी गेलेल्या एका तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. कारंजा (घाडगे) तालुक्यातील जुनापाणी या ठिकाणी ही घटना घडली आहे. गुणवंत यादव गाखरे असे या तरुणाचे नाव आहे. दुपारी गावालगतच्या शेतातील विहिरीत गावातील गणपती विसर्जन करण्यासाठी गेले असताना ही घटना घडली.

कराड :

कराड तालुक्यातील गणेश विसर्जनादरम्यान विविध घटनांमध्ये एकाचा मृत्यू झाला असून 1 जण बेपत्ता आहे. मालखे़डजवळील कृष्णा नदीत गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करताना अनिरुद्ध संजय मोहिते (19) या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे कोयना नदी पाञात 22 वर्षीय युवक बुडाल्याची घटना घडली आहे. चेतन विजय शिंदे (21) असे बुडलेल्या युवकाचे नाव आहे.

रत्नागिरी :

गणेश विसर्जनासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलं खाडीपात्रात पडल्याची घटना राजापूरमधील पडवे गावात घडली आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने ही दोन्ही मूल बुडाली असून सध्या या मुलांचा शोध सुरु आहे.

पुणे :

गणपती विसर्जनादरम्यान वृदेश्वर घाटाजवळ एक तरुण बुडाल्याची घटना घडली आहे. बुडालेल्या तरुणाचा शोध घेतला जात असून अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

नांदेड :

गणेश विसर्जनावेळी एका भाविकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. शशिकांत कोडगीरवार (21) असे या तरुणाचा नाव आहे. हदगाव तालुक्यातील तामसा गावात ही घटना घडली आहे

शेवगाव :

नगरमधील शेवगावमध्ये गणेश विसर्जनादरम्यान एका मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. अनिल वाल्हेकर (19) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. संध्याकाळी 6 च्या सुमारास ही घटना घडली. अनिल हा आपल्या मित्रासोबत गणपती विसर्जनासाठी गेला असताना ही दुर्घटना घडली.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.