देवेंद्र फडणवीस, मी माझ्या अटकेची वाट पाहतोय, अनिल देशमुख असं का म्हणाले?
"गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी अनिल देशमुखांनी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकला", असा आरोप करण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख हे दोघेही एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत. त्यातच आता अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयने एफआयआर दाखल केला आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा आरोप अनिल देशमुखांवर करण्यात आला आहे. आता याप्रकरणी अनिल देशमुख यांनी एक ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
अनिल देशमुख यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक ट्वीट केले आहे. गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी अनिल देशमुखांनी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकला, असा आरोप करण्यात आला आहे. त्यावर आता अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीस मी माझ्या अटकेची वाट पाहत आहे, असे म्हटले आहे.
अनिल देशमुख काय म्हणाले?
“देवेंद्र फडणवीस यांनी 4 वर्षापूर्वीची घटना उकरुन काढत माझ्याविरुध्द दिल्लीच्या मदतीने CBI FIR दाखल केली आहे. 4 वर्षापुर्वी मी गृहमंत्री असतांना जळगावच्या एका घटनेमध्ये भाजपाचे नेते गिरीष महाराज यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी जळगावच्या पोलीस अधिकाऱ्यावर दबाव टाकला होता, हा माझ्यावर आरोप आहे.
माझ्या माहितीनुसार माझ्यावर रेड टाकुन मला अटक करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करीत आहेत. ज्या देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीच्या मदतीने ED-CBI ला हाताशी धरुण महाराष्ट्राचे राजकारण अतिशय खालच्या स्तरावर आणले त्यांना सांगु ईच्छीतो की, देवेंद्र फडणवीस मी माझ्या अटकेची वाट पाहत आहे”, असे अनिल देखमुखांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी 4 वर्षा पुर्वीची घटना उकरुण काढीत माझ्या विरुध्द दिल्लीच्या मदतीने CBI FIR दाखल केली आहे. 4 वर्षापुर्वी मी गृहमंत्री असतांना जळगावच्या एका घटनेमध्ये भाजपाचे नेते गिरीष महाराज यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी जळगावच्या पोलीस अधिकाऱ्यावर दबाव टाकला होता, हा…
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) September 10, 2024
नेमकं प्रकरण काय?
गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत महाविकासआघाडी सरकार असताना मला मोक्का अंतर्गत अटक करण्यासाठी अनिल देशमुख यांनी खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला होता असा गंभीर आरोप केला होता. हा संपूर्ण प्रकार प्रवीण मुंडे यांनीच माझ्या लक्षात आणून दिला. त्यानंतर मी यासंदर्भात अनिल देशमुख यांना जाब विचारला होता, असे देखील गिरीश महाजन म्हणाले. याप्रकरणी नुकतच सीबीआयकडून चौकशी करण्यात आली असून आता अनिल देशमुख यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढ झाली आहे. सीबीआयकडून त्यांच्यवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकण्यात आल्याचा आरोप अनिल देशमुखांवर आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.