Anil Parab on ST Bus Workers strike : एसटी कर्मचाऱ्यांची सर्व काळजी घेऊ, पण बेशिस्तही खपवून घेणार नाही; अनिल परब यांचा इशारा

परब यांनी आम्ही एसटी कर्मचाऱ्यांची सर्व काळजी घेऊ पणे बेशिस्तही खपवून घेतली जाणार नाही, अशा कडक शब्दांत इशारा दिला. तसेच कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे असे आवाहन त्यांनी केले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

Anil Parab on ST Bus Workers strike : एसटी कर्मचाऱ्यांची सर्व काळजी घेऊ, पण बेशिस्तही खपवून घेणार नाही; अनिल परब यांचा इशारा
ANIL PARAB

मुंबई : राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाला एसटी कर्मचाऱ्यांनी धुडकावलं असून ते एसटी महामंडळाच्या वीलीनीकरणावर ठाम आहेत. आज पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांची संघटना तसेच परिवहनमंत्री अनिल परब यांच्यात विविध प्रश्नांवर बैठक झाली. या बैठकीनंतर आम्ही एसटी कर्मचाऱ्यांची सर्व काळजी घेऊ पणे बेशिस्तही खपवून घेतली जाणार नाही, अशा कडक शब्दांत इशारा दिला. तसेच कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे असे आवाहन त्यांनी केले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

कर्मचाऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही याची खबरदार घेऊ

“एसटी कर्मचाऱ्यांना दिलेली पगारवाढ मूळ वेतनात दिलेली आहे. आज काही कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या. कोणत्याही कामगारावर अन्याय होणार नाही. कोणताही कनिष्ठ कामगार वरिष्ठ कामगाराच्या वर जाणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. एसटी महांडळाच्या विलीनीकरणावर चर्चा झाली. काही जाचक अटींवर चर्चा केली जाईल. कर्मचाऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही याची खबरदार घेऊ. पण कोणतीही बेशिस्त खपवून गेतली जाणार नाही, याची माहिती आम्ही आज कामगारांच्या शिष्टमंडळाला दिली,” असे अनिल परब म्हणाले.

कामगारांनी एसटीचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत

तसेच पुढे बोलताना त्यांनी अजूनही चर्चेची दारं खुली आहेत. पण आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केले. “एसटी बंद ठेवणं एसटी महामंडळ तसेच कर्मचाऱ्यांना परवडणारं नाही. कोणाचंही नुकसान होऊ नये यासाठी कामगारांनी रुजू व्हावं. संप संपल्यानंतर काम सुरु होईल तेव्हा छोट्या-मोठ्या प्रश्नांवर चर्चा करता येईल. चर्चेची दारं खुली आहेत. आम्ही चार पावलं पुढे आलो आहेत. कामगारांनी एसटीचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. कामगारांचे हक्क अबाधित ठेवणं हे आमचं काम आहे. प्रश्नांचं समाधानकारक उत्तर शोधता येईल,” असे परब म्हणाले.

तर कारवाईचा बडगा उगारावा लागेल

तसेच कर्मचारी कामावर रुजू झाले नाहीत तर शासनाला कडक पवित्रा घ्यावा लागेल असे परब म्हणाले. “उद्या बऱ्यापैकी एसटी सुरु होतील. उद्या कामगार येत असतील तर आम्ही त्यांना कामावर येण्याची परवानगी देऊ. जर कर्मचारी कामावर आले नाही तर कारवाईचा बडगा उगारावा लागेल. कर्मचारी कामावर येण्यासाठी प्रतिसाद देत आहेत. आम्ही कोणत्याही प्रश्नावर चर्चा करायला तयार आहोत,” असे परब म्हणाले.

इतर बातम्या :

कोल्हापूर विधान परिषद निवडणूक : बिनविरोध निवड झाल्यानंतर सतेज पाटलांची पहिली प्रतिक्रिया

भाजपने कोणत्याही परिस्थितीत सरकार पाडायचं ठरवलंय, पण त्यांना यश येणार नाही; भुजबळांचा टोला

सातवा वेतन आयोग लागू झाल्यावर संप मिटणार?; कर्मचारी संघटना आणि अनिल परब यांच्यात चर्चा सुरू


Published On - 7:38 pm, Fri, 26 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI