बाजारात किरकोळ व्यापाऱ्यांना प्रवेश बंद, एपीएमसी प्रशासनाचा सोशल डिस्टन्सिंगसाठी मोठा निर्णय  

एपीएमसी प्रशासनाकडून रोज नवनवीन उपयोजना करून सुद्धा एपीएमसी बाजारात गर्दीमूळे सोशल डिस्टन्सिंग ठेवणे (APMC market may shift kharghar due to rush)  कठीण झाले आहे.

बाजारात किरकोळ व्यापाऱ्यांना प्रवेश बंद, एपीएमसी प्रशासनाचा सोशल डिस्टन्सिंगसाठी मोठा निर्णय  
Follow us
| Updated on: Mar 30, 2020 | 12:43 PM

नवी मुंबई : एपीएमसी प्रशासनाकडून रोज नवनवीन उपयोजना करून सुद्धा एपीएमसी बाजारात गर्दीमूळे सोशल डिस्टन्सिंग ठेवणे (APMC market may shift kharghar due to rush)  कठीण झाले आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी एपीएमसी प्रशासनाने बाजार विस्तार करण्याचे ठरवले आहे. तसेच बाजारात किरकोळ खरेदीदांना आत सोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. बाजारातील गर्दी कमी झाली नाही तर संपूर्ण बाजार खारघर येथे हलवण्यात येईल, असा निर्णय कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, बाजार समिती सचिव अनिल चव्हाण आणि इतर अधिकाऱ्यांसोब झालेल्या बैठकीत घेण्यात (APMC market may shift kharghar due to rush) आला.

दिवसेंदिवस राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. ही वाढ लक्षात घेता राज्यात लॉकडाऊन आणि संचारबंदी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर गर्दीची ठिकाणंही बंद करण्यात आली आहे. या लॉकडाऊनमध्ये शहरातील काही बड्या बाजारपेठा मात्र सुरु ठेवण्यात आल्या आहेत. पण या बाजारपेठेतील गर्दी सध्या धोकादायक ठरत आहे. ही गर्दी कमी झाली नाही, तर हा भाजीपाला आणि फळ बाजार वाशी येथून खारघर येथे हलवण्यात येणार आहे. बाजारपेठ दुसरीकडे स्थलांतरीत करणार त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

बैठकीत घेण्यात आलेल्या महत्त्वाचे निर्णय

गर्दी कमी करण्यासाठी भाजीपाला मंडी एसटी महामंडळ यांच्या चार एकर मोकळ्या जागेवर 200 हलवण्यात येईल. यामुळे मूळ बाजारात गर्दी कमी होण्यास मदत मिळणार आहे.

भाजीपला आणि फळे बाजाराच्या बाहेर प्रवेशद्वाराजवळ 500 मीटरपर्यंत 10 लेनची मोठी बैरिकेटिंग करण्यात आली आहे. या बैरिकेटिंगच्या माध्यमातून सोशल डिस्टन्सिंग प्रणालीचा वापर करून व्यापारी, कामगारांना आत सोडण्यात येणार आहे.

वाशी येथे आजपासून भाजीपाला आणि फळ बाजाराच्या आवारात किरकोळ खरेदीदाराना प्रवेश बंद करण्यात आली आहे. आता फक्त होलसेलर यांनाच आत सोडण्यात येणार. त्याच बरोबर आतमध्ये प्रत्येक गाळा बाहेर एक मीटरची सोशल डिस्टन्सिंग कठोर रित्याने पालन करण्यात येईल.

बाजार समितीत असलेले सर्व घाऊक व्यापारी आणि इतर घटकांनी जर हे नियम तोडले तर भाजीपाला आणि फळ बाजाराच्या जवळ जवळ 2000 व्यापाऱ्यांना खारघर येथे सेंट्रल पार्कच्या जवळ 50 ते 60 एकर भूखंडावर दोन ते चार दिवसात पाठवण्या येईल.

वाशी येथे आजपासून भाजीपाला आवारात 300 गाड्या सोडण्यात येणार आहे. जे नियम तोडतील त्यांचे लायसन्स रद्द करण्यात येणार आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.