Ambernath Kamgar Sena : मनसेच्या पालिका कर्मचारी सेनेची फेररचना, धनंजय गुरव यांची युनिट अध्यक्षपदी निवड

या नव्या कार्यकारिणीत धनंजय गुरव यांची अंबरनाथ नगरपालिका युनिटच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर अनेक नव्या चेहऱ्यांचाही या कार्यकारिणीत समावेश करण्यात आलाय.

Ambernath Kamgar Sena : मनसेच्या पालिका कर्मचारी सेनेची फेररचना, धनंजय गुरव यांची युनिट अध्यक्षपदी निवड
मनसेच्या पालिका कर्मचारी सेनेची फेररचनाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 10:19 PM

अंबरनाथ : मनसेच्या महापालिका कामगार सेने (MNS Municipal Kamgar Karmachari Sena)च्या अंबरनाथ नगरपालिका युनिट अध्यक्षपदी धनंजय गुरव (Dhananjay Gurav) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कामगार सेना अध्यक्ष संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी ही नियुक्ती केली. अंबरनाथ नगरपालिकेत 714 कर्मचारी असून यातील बहुतांशी कर्मचारी हे मनसेच्या महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे सदस्य आहेत. अंबरनाथ पालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून मनसेची महापालिका कर्मचारी कामगार सेना कार्यरत असून आतापर्यंत धनंजय गुरव हे या कार्यकारिणीत कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होते. मात्र मनसे कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्या आदेशानुसार अंबरनाथ पालिका युनिटची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

अनेक नव्या चेहऱ्यांचा कार्यकारिणीत समावेश

या नव्या कार्यकारिणीत धनंजय गुरव यांची अंबरनाथ नगरपालिका युनिटच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर अनेक नव्या चेहऱ्यांचाही या कार्यकारिणीत समावेश करण्यात आलाय. या नियुक्तीबद्दल मनसेचे जिल्हा संघटक संदीप लकडे आणि मनसेचे अंबरनाथ शहराध्यक्ष कुणाल भोईर यांनी धनंजय गुरव यांचं अभिनंदन केलं. यावेळी सुधीर राऊत, हर्षद वेंगुर्लेकर, अमोल गुरव हे देखील उपस्थित होते. या नियुक्तीनंतर पूर्वीप्रमाणेच यापुढेही कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचं धनंजय गुरव यांनी सांगितलं.

जुनी कार्यकारिणी बरखास्त करण्याचे कारण गुलदस्त्यात

दरम्यान, नवीन कार्यकारिणी घोषित करताना जुनी कार्यकारिणी बरखास्त का केली? याचं कारण मात्र स्पष्ट होऊ शकलेलं नाही. आता येत्या काही दिवसात नवीन कार्यकारिणीसोबत कामगारांची भेट घेऊन कामगारांच्या समस्या समजून घेणार असून त्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं धनंजय गुरव यांनी सांगितलं. (Appointment of Dhananjay Gurav as Ambernath Municipal Unit President of MNS Municipal Kamgar Karmachari Sena)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.