तुमच्या मतदारसंघात किती वाजता निकाल लागणार?

मुंबई :  देशभरात लोकसभा निकालाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. महाराष्ट्रातही 48 लोकसभा मतदारसंघाचा निकाल काय असणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. निकालाला अगदी काही तास शिल्लक असले तरी 23 मे रोजी दुपारपर्यंत मतदारसंघांचे केवळ कल लक्षात येतील. मात्र, अंतिम निर्णय येण्यास बराच उशिर होईल. त्यामुळे कोणत्या मतदारसंघाचा निकाल किती वाजता लागणार हा प्रश्न शिल्लकच […]

तुमच्या मतदारसंघात किती वाजता निकाल लागणार?
Follow us
| Updated on: May 22, 2019 | 7:37 PM

मुंबई :  देशभरात लोकसभा निकालाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. महाराष्ट्रातही 48 लोकसभा मतदारसंघाचा निकाल काय असणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. निकालाला अगदी काही तास शिल्लक असले तरी 23 मे रोजी दुपारपर्यंत मतदारसंघांचे केवळ कल लक्षात येतील. मात्र, अंतिम निर्णय येण्यास बराच उशिर होईल. त्यामुळे कोणत्या मतदारसंघाचा निकाल किती वाजता लागणार हा प्रश्न शिल्लकच राहतो. टीव्ही 9 मराठीने मतदारसंघनिहाय कोणत्या मतदारसंघात मतमोजणीच्या किती फेऱ्या होणार याचा अभ्यास करुन निकालाची वेळ काय असेल याचा अचूक अंदाज लावला आहे.

सकाळी 7 वाजता उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर EVM यंत्रे स्ट्राँग रुममधून बाहेर काढली जाणार

प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या साधारण 18 ते 20 फेऱ्या होणार आहेत. एका फेरीसाठी साधारणपणे 30 मिनीटे लागतात. 1 फेरीची मतमोजणी झाल्यानंतर आणि त्यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची स्वाक्षरी झाल्यानंतरच दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. EVM मधील मतांची मोजणी आणि VVPAT च्या मतांची मोजणी होणार असल्यास  अशा स्थितीत प्रत्येक फेरीसाठी जवळपास 40 ते 45 मिनीटे लागतील. त्यामुळे निकाल घोषित होण्यास काहीसा विलंब होईल. सकाळी 7 वाजता उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत EVM यंत्रे मतमोजणीसाठी स्ट्राँग रुममधून बाहेर काढली जाणार आहेत. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर 3 कर्मचारी राहणार आहेत. यामध्ये एक सुपरवायझर, एक सहाय्यक आणि एक सूक्ष्म निरीक्षक असणार आहे.

एका विधानसभा मतदारसंघातील 5 VVPAT मशिनची मते आणि प्रत्यक्ष EVM ची मते यांची पडताळणी करण्याचे निर्देश असल्याने यासाठी काहीसा अधिक कालावधी लागणार आहे. त्यासाठी काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. VVPAT मते आणि प्रत्यक्ष EVM मते यात फरक आढळल्यास त्याची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात येणार आहे. त्यानंतर आयोग यावर अंतिम निर्णय घेईल. मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. उद्या (23 मे रोजी) सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होईल. सर्वात अगोदर पोस्टल मतदानाची मोजणी होणार असल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

बीड : मतमोजणी संध्याकाळी 8 वाजेपर्यंत चालेल. बीडमध्ये मतमोजणीच्या एकूण 36 फेऱ्या होणार आहेत.

लातूर : मतमोजणी सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालण्याची शक्यता आहे.

उस्मानाबाद : मतमोजणीसाठी सायंकाळी 4 वाजण्याची शक्यता आहे. येथे 27 फेऱ्याद्वारे मतमोजणी होणार आहे.

परभणी : मतमोजणीसाठी सायंकाळी 7 वाजण्याची शक्यता आहे.

हिंगोली : मतमोजणी सायंकाळी 4 वाजण्याची शक्यता आहे.

नांदेड : मतमोजणीसाठी रात्री 8 वाजण्याची शक्यता आहे.

जालना : मतमोजणीसाठी सायंकाळी 7 वाजण्याची शक्यता.

औरंगाबाद : मतमोजणीसाठी सायंकाळी 4 वाजण्याची शक्यता आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एकूण 26 फेऱ्या होणार आहेत.

सातारा : मतमोजणी होऊन निकालाचे चित्र स्पष्ट व्हायला 5 वाजतील असा अंदाज आहे. मात्र, अंतिम निकाल VVPAT ची मोजणी रात्री 10 पर्यंत चालु राहणार आहे.

रत्नागिरी- सिंधुदूर्ग : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात एकूण मतमोजणीच्या 25 फेऱ्या होतील. प्रत्येक फेरीत 84 EVM ची मोजणी होईल. अंतिम अधिकृत निकाल दुपारी 2 वाजेपर्यंत कळेल. कुडाळ विधानसभा मतदारसंघाचा निकाल सर्वात लवकर लागेल. या मतदारसंघात 20 मतमोजणीच्या फेऱ्या होणार आहेत. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचा निकाल सर्वात उशिरा अपेक्षित आहे. या विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या 25 फेऱ्या होणार आहेत.

रायगड : या लोकसभा मतदारसंघासाठी अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड, दापोली, गुहागर अशा एकूण 6 विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 16 लाख 51 हजार 560 मतदारांपैकी 61.77 टक्के म्हणजे 10 लाख 20 हजार 140 मतदारांनी मतदान केले होते. विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणीसाठी प्रत्येकी 14 टेबल्सची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानुसार रायगड लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या एकूण 156 फेऱ्या होणार आहेत. सर्वाधिक 28 मतमोजणी फेऱ्या महाड विधानसभा मतदारसंघात, तर सर्वात कमी 23 मतमोजणी फेऱ्या गुहागर विधानसभा मतदारसंघाच्या होणार आहेत. अंतिम अधिकृत निकाल दुपारी 3 वाजेपर्यंत कळेल.

नाशिक : नाशिक-दिंडोरी लोकसभा निवडणुकांसाठी उद्या होणाऱ्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय 14 टेबल्स लावण्यात आले आहेत. नाशिक लोकसभेच्या 27 फेऱ्या होणार आहेत. या लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी अंबड वेअर हाऊस येथे होणार आहे. यंदा प्रथमच मतमोजणीदरम्यान व्हीव्हीपॅटचा वापर होणार असल्याने अधिकृत निकाल येण्यासाठी संध्याकाळी 8 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. नाशिकची मतमोजणी 27 फेऱ्यांमध्ये तर दिंडोरीची मतमोजणी 25 फेऱ्यांमध्ये होणार आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी होणार असल्याने 14 टेबल्स तयार करण्यात आले आहेत. शेवटचा टेबल व्हीव्हीपॅटसाठी असणार आहे.

नंदुरबार : जिल्हा प्रशासनाने नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची तयारी पूर्ण केली आहे. शहरातील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये ही मतमोजणी होणार आहे. त्या मतमोजणीसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. मतमोजणीसाठी एकूण 96 टेबल लावण्यात येणार असून एकूण 27 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत निकाल लागेल असा अंदाज निवडणूक अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.

धुळे : लोकसभा मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यात मतदान पार पडले होते. धुळे लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी शहरातील शासकीय गोदामात होणार आहे. या मतमोजणीची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय एकूण 120 टेबल असतील. धुळे लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी शहरातील शासकीय गोदामात होईल. प्रशासनाने तयारी पूर्ण केली असून मतमोजणीसाठी 19 फेऱ्या होणार असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे मतमोजणीच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. साधारणपणे 2 वाजेपर्यंत मतमोजणी पूर्ण होईल, अशा अंदाज आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर मतदारसंघात मतमोजणीसाठी 20 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे मतमोजणीच्या 22 फेऱ्या होणार आहेत. प्रत्येक फेरीला अर्धा तास वेळ लागतो. त्यानुसार सायंकाळी 5 ते 6 वाजण्याच्या सुमारास निकाल लागेल, असा अंदाज आहे.

सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी 20 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत येथील निकाल लागण्याची शक्यता आहे.

गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात मतमोजणी तयारी अंतिम ठप्यात आली आहे. उघा सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. या मतदारसंघात मतमोजणीसाठी 84 टेबल आणि 800 कर्मचाऱ्यांची नियुक्त करण्यात आली आहे. 25 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होईल. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त आणि अतिसंवेदनशील असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला कसून तपासणी केल्यानंतरच प्रवेश दिला जात आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात 5 उमेदवार रिंगणात आहेत.

नागपूर : या मतदारसंघात सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. मतमोजणी प्रक्रियेकरिता नागपूर जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. नागपूरचा अंतिम निकाल रात्री 11 नंतरच लागणार आहे. प्रत्येक मतदारसंघासाठी 20 टेबल यानुसार नागपूरमधील 6 विधानसभा मतदारसंघांसाठी 120 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. नागपूरसाठी 19 फेऱ्या होणार आहेत. उद्या सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होईल. प्रथम टपाल मतपत्रिकांची मोजणी होणार आहे. या ठिकाणी 2 हजार पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत.

रामटेक : रामटेकचा अंतिम निकाल रात्री 11 नंतरच लागण्याची शक्यता आहे. प्रत्येक मतदारसंघासाठी 20 टेबल यानुसार रामटेकसाठी 120 टेबल लावण्यात आले आहेत. येथे मतमोजणीच्या 25 फेऱ्या होणार आहेत.

चंद्रपूर : या मतदारसंघात 11 एप्रिल रोजी मतदान पार पडले होते. देशातील पहिल्या टप्प्यातील मतदानात चंद्रपूरसह पूर्व विदर्भातील 7 जागांचा समावेश होता. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी शहराजवळ असलेल्या  MIDC मधील वखार महामंडळाच्या गोदाम इमारतीचा उपयोग केला जाणार आहे. चंद्रपूर लोकसभेसाठी 6 विधानसभानिहाय प्रत्येकी 14 टेबलवर मतमोजणी होणार आहे. यासाठी सुमारे 350 कर्मचारी तैनात असणार आहेत. कर्मचारी-पोलीस आणि अधिकारी यांच्यासह मतमोजणी प्रतिनिधींसाठी गोदाम परिसरातच व्यवस्था करण्यात आली आहे. एकाच वेळी 84 टेबलवर मतमोजणी सुरु असेल. प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष निकाल हाती येण्यासाठी रात्रीचे 9 वाजणार आहेत.

पालघर : पालघरमधील मतमोजणीसाठी सूर्या प्रकल्पाच्या गोडाऊनमध्ये सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. 35 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी पूर्ण  केली जाईल. पालघर लोकसभा क्षेत्रात 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. विक्रमगड, पालघर,  डहाणू, बोईसर, नालासोपारा,  वसई अशा 6 विधानसभा क्षेत्रांचा यात समावेश आहे. त्यामध्ये 18 लाख 85 हजार 297 मतदार असून त्यापैकी 12 लाख 1298 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.यात प्रत्येक मतदारसंघातील मतमोजणीसाठी 14 टेबल असणार आहेत. मतमोजणी प्रक्रियेसाठी जवळपास 1600  अधिकारी आणि कर्मचारी तैनात असणार आहेत.

जालना : या लोकसभा मतदारसंघात मतमोजणीच्या 25 फेऱ्या होतील. यासाठी 800 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभानिहाय एकूण 84 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे.

यवतमाळ : यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी 371 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राळेगाव, यवतमाळ, वाशीम, कारंजा, पुसद, दिग्रस या 6 मतदारसंघनिहाय 6 हॉलमध्ये मतमोजणी प्रक्रिया पार पडेल.

Non Stop LIVE Update
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा.
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन.
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.