राज्यपालांना संविधान मान्य आहे का?; अर्जुन खोतकरांचा सवाल

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रावर बोलताना राज्यपालांना संविधान मान्य आहे का?, असा सवाल खोतकरांनी उपस्थित केला.

राज्यपालांना संविधान मान्य आहे का?; अर्जुन खोतकरांचा सवाल
Follow us
| Updated on: Oct 14, 2020 | 6:41 PM

अहमदनगर : शिवसेना नेते  माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी मंदिर उघडण्याच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रावर बोलताना राज्यपालांना संविधान मान्य आहे का?, असा सवाल खोतकरांनी उपस्थित केला. (Arjun Khotkar raised question on letter of Governor Koshyari)

गेल्या 35 वर्षांपासून मी विधीमंडळ राजकारणात आहे. यापूर्वीच्या राज्यपालांनी असं विधान केलेलं नाही. ज्या राज्यघटनेनं त्यांना या पदावर बसवलं ती राज्यघटना मान्य आहे का? असा सवाल अर्जुन खोतकर यांनी उपस्थित केला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 12 ऑक्टोबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले. मुख्यमंत्र्यांनीही राज्यपालांना प्रत्राद्वारे प्रत्युत्तर दिलं. यानंतर सुरु झालेलं राजकारण थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत.

भाजपवर टीका

राज्यात कोरोनामुळं होणाऱ्या मृत्यूचा दर कमी झालेला नाही. भाजपवाल्यांना मंदिराचे काही देणे घेणे नाही. त्यांना केवळ फक्त लोकांच्या भावना भडकावून त्यातून आपली पोळी साध्य करून घ्यायची आहे, असा घणाघात खोतकरांनी केलाय. भावनिक गोष्टींना हात घालायचा आणि लोकांन भडकवून राज्यामध्ये द्वेषाचे राजकारण करायचे. ही भाजपची पद्धतच आहे, असा आरोप अर्जुन खोतकर यांनी केला.

एकनाथ खडसेंचा पक्षप्रवेशाचा मुहूर्त बाकी

भाजपचे ज्येष्ठ नेते  एकनाथ खडसे यांचा आता केवळ पक्ष प्रवेशाचा मुहूर्त ठरायचे बाकी आहे. खडसे मोठे नेते आहेत, बरे वाईट काय ते त्यांना कळते. लवकरचं ते निर्णय घेतील, असं खोतकर म्हणाले.

राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे समर्थपणे निर्णय घेत आहेत.  कोरोना संकटात मुख्यमंत्र्यांनी योग्य प्रकारे काम करत आहेत, असंही खोतकर यांनी म्हटलं.

संबंधित बातम्या:

Arjun Khotkar | अखेर कोविडने गाठलेच, माजी मंत्री अर्जुन खोतकरांना कोरोनाची लागण

Shivaji Maharaj statue | कानडी लोकांना त्याचे परिणाम भोगावे लागतील: अर्जुन खोतकर

(Arjun Khotkar raised question on letter of Governor Koshyari)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.