'त्या' चार अल्पवयीनांची हत्या करणाऱ्या दोषींना 24 तासांत पकडा, नातेवाईकांची आर्त हाक

रात्रीच्या सुमारास या चारही भावंडांची अज्ञातांनी कुर्‍हाडी गळा चिरत हत्या केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने महाराष्ट्रासह मध्य प्रदेशात खळबळ उडाली.

'त्या' चार अल्पवयीनांची हत्या करणाऱ्या दोषींना 24 तासांत पकडा, नातेवाईकांची आर्त हाक

जळगाव : जिल्ह्यातील रावेर येथे बोरखेडा रस्त्यावरील शेतातील एका घरात चार अल्पवयीन भावंडांची अज्ञातांनी हत्या केल्याने संपूर्ण महाराष्ट्रासह मध्य प्रदेशात खळबळ उडाली. रात्रीच्या सुमारास या चारही भावंडांची अज्ञातांनी कुर्‍हाडी गळा चिरत हत्या केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने महाराष्ट्रासह मध्य प्रदेशात खळबळ उडाली. (arrest culprits within 24 hours )

घटनास्थळी मृतांचे आई वडील हे मुलांना अशा वस्तीत पाहून बेशुद्ध झाले. पोटाचे चार गोळे त्यांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने आई-वडिलांचे व परिवाराचे दुःख अनावर झाले होते. दरम्यान मृतांच्या नातेवाईकांनी या घटनेचा निषेध केला असून घटनेतील दोषींना 24 तासांच्या आत पकडावे, अशी मागणी नातेवाईकांनी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे. मध्य प्रदेश सीमेलगत असलेल्या रावेर शहरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर एका शेतात सालदार म्हणून राहणाऱ्या महताब आणि रुमली बाई भिलाला हे दाम्पत्य आपल्या मध्य प्रदेशातील मूळ गावी गेले असता, शेतातील घरात चार अल्पवयीन भावंडे एकटी होती.

जळगाव जिल्ह्यातील रावेरवरून एक किलोमीटर अंतरावर बोरखेडा रस्त्यावर असलेल्या एका शेतात सालदार म्हणून काम पाहणाऱ्या आदिवासी कुटुंबातील चार अल्पवयीन भावंडांची हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून, यात दोन बहिणी आणि दोन भाऊ अशा चौघांची हत्या झाली आहे. मृतांमध्ये सईता (१२), रावल (११), अनिल (०८), सुमन (०३) अशा भावंडांचा समावेश आहे.

मूळ मध्य प्रदेशातल्या खरगोन जिल्ह्यातील गुढी या गावचे रहिवासी असलेले महताब गुलाबचंद व रूमली बाई भीलाला हे आदिवासी दाम्पत्य गेले सात-आठ वर्षांपूर्वी पोटाची खळगी भरण्यासाठी महाराष्ट्रातील रावेरजवळ असलेल्या केळीच्या बागेत सालदार म्हणून काम करत होते. या दाम्पत्याला 5 मुले होती. नातेवाईकांच्या दशक्रियेसाठी महताब गुलाबचंद व रुमली बाई हे आपल्या मोठ्या मुलांसह मध्य प्रदेशातील खरगोन येथे गेले होते. तिथे उशीर झाल्याने महताब गुलाबचंद व रूमली बाई हे रात्री तिथेच थांबले. इकडे शेतातील घरी सईता, रावल, अनिल, सुमन ही अल्पवयीन चार भावंडे रात्री घरी एकटे होती.

आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास शेतमालक मुस्ताक हे शेतात आल्यावर सालदार महताबच्या घराचे दार बंद दिसले. दारू चुकूनही घरातून प्रतिसाद न मिळाल्याने अखेर मुस्ताक यांनी घरात डोकावून पाहिले असता चारही भावंडे रक्ताच्या थारोळ्यात दिसली. शेतमालक मुस्ताक यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. रावेर उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र इंगळे यांच्यासह अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुमार चिंथा, जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे घटनास्थळी दाखल होऊन तब्बल 7 तास घटनास्थळी पोलिसांचा तपास चालला. या घटनेबाबत एसआयटी पथकासह पाच विशेष पोलीस अधिकाऱ्याची पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी तपासणीसाठी नियुक्ती करत या पथकाने घटनास्थळी तपास केला.

या घटनेत मृतांमध्ये एका बालिकेवर बलात्काराचा आरोप करत मध्य प्रदेश आदिवासी संघटनेने सदर घटनेत तात्काळ चौकशी करावी अन्यथा महाराष्ट्रासह मध्य प्रदेशात आदिवासी समाजातर्फे आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला. दरम्यान या घटनेतील चारही मृतांचं इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात येणार असून, पोलीस गुन्हेगारांचा शोध घेत असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले. मात्र एकाच परिवारातील चार अल्पवयीन भावंडांच्या वतीने जळगाव जिल्ह्यात मात्र खळबळ उडाली आहे. या सर्व घटनेची माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी निंदा केली असून, जळगाव जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था अतिशय गंभीर आहे. त्याकडे पोलिसांनी आता अधिक लक्ष देणे गरजेचे असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.

इतर बातम्या –

जळगावात चौघांची कुऱ्हाडीने हत्या, शेतात मृतदेह सापडल्याने खळबळ

सावधान! मेंदूत जळजळ झाल्यास गंभीर; कोरोनाचं समोर आलं धक्कादायक लक्षणं

महाराष्ट्र हादरला! 7 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न, मुलीचा ओठ तुटला

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *