बीड, जालना, औरंगाबादमधील विविध गावात कृत्रिम पाऊस बरसला

अमेरिकेहून आलेल्या विमानाने औरंगाबाद, जालना, बीड आणि अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात क्लाऊड सीडिंग (Artificial rainfall) केलं. यापैकी औरंगाबाद जिल्ह्यातील विविध भागात अर्ध्या तासापेक्षा जास्त कृत्रिम पाऊस पडला असल्याचं प्रशासनाने सांगितलंय.

बीड, जालना, औरंगाबादमधील विविध गावात कृत्रिम पाऊस बरसला

औरंगाबाद : सलग दुसऱ्या दिवशी मराठवाड्यातील काही भागात कृत्रिम पाऊस (Artificial rainfall) पाडला असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आलाय. अमेरिकेहून आलेल्या विमानाने औरंगाबाद, जालना, बीड आणि अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात क्लाऊड सीडिंग (Artificial rainfall) केलं. यापैकी औरंगाबाद जिल्ह्यातील विविध भागात अर्ध्या तासापेक्षा जास्त कृत्रिम पाऊस पडला असल्याचं प्रशासनाने सांगितलंय. दरम्यान, कृत्रिम पाऊस पडल्याची कबुली मंगळवारी शेतकऱ्यांनीही दिली होती.

क्लाऊड सीडिंगनंतर हलका, मध्यम आणि जोरदार अशा तीनही स्वरुपाचा पाऊस पडत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. अधिकारी लवकरच याबाबत अधिकृत माहिती देणार आहेत.

पावसाचा प्रयोग यशस्वी झाल्यास मराठवाड्याला नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे. कारण, अद्याप मराठवाड्यातील जायकवाडी वगळता इतर जलसाठे शून्य टक्क्यांवर आहेत. शेतीसोबतच पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

या भागातही क्लाऊड सीडिंग

अंबड, जालना

रुई, अंबड, जालना

साकली बाबा दर्गा, घनसांगवी, जालना

पारडा, अंबड, जालना

तनवाडी, घनसांगवी, जालना

गुरु पिंपरी, घनसांगवी, जालना

पिरगैबवाडी, घनसांगवी, जालना

मोमदाबाद, जालना

कार्ला, जालना

खोडेपुरी, जालना

भिलपुरी, जालना

कोरडगाव, पाथर्डी, अहमदनगर

मोहरी, पाथर्डी, अहमदनगर

पाथर्डी, अहमदनगर

वसू, पाथर्डी, अहमदनगर

अमरापूर, शेवगाव, अहमदनगर

मंगळवारीही पाऊस पडला, शेतकऱ्यांची माहिती

9 ऑगस्ट रोजी सुरु केलेला प्रयोग फेल गेल्यानंतर अमेरिकेहून विमान मागवलं होतं. अमेरिकेचं विमान रविवारी हजर झालं. सोमवारी उड्डाण झालं नाही. मंगळवारी उड्डाण झालं. सोलापूर आणि मराठवाडा परिसरात विमान फिरलं. या विमानाने जालना आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमाभागात पाऊस पाडल्याचा दावा प्रशासनाने केला.

दरम्यान, जालना जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनीही पाऊस पडला असल्याचं सांगितलंय. अंबड तालुक्यातील कोडगाव, सुखापुरी, लखमापुरी, झिरपी आणि अंबड शहरात किरकोळ स्वरुपाचा पाऊस पडल्याची माहिती आहे. घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली गावात मंगळवारी सायंकाळी 4 वाजून 45 मिनिटे ते साडे पाचच्या दरम्यान हलक्या सरी कोसळल्या. सुखापुरी आणि लखमापुरी गाव परिसरात विमान पाहिल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *