Child Death : राज्यात दीड वर्षात तब्बल 22 हजार बालमृत्यू, सिंधुदुर्गमध्ये सर्वांत कमी

मागच्या 17 महिन्यात 0 ते 5 वयोगटातील ही आकडेवारी मिळाली आहे. यामध्ये सर्वात जास्त बालमृत्यू मुंबई आणि मुंबई उपनगरात झाले असून ते 1 हजार 898 आहेत.

Child Death : राज्यात दीड वर्षात तब्बल 22 हजार बालमृत्यू, सिंधुदुर्गमध्ये सर्वांत कमी
प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीवर चाकूहल्ला
Follow us
| Updated on: Aug 02, 2022 | 8:39 AM

मुंबई – मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक जिल्ह्यांत अधिक बालमृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. सिंधुदुर्गमध्ये (Sindhudurg) सर्वांत कमी बालमृत्यू नोंद झाली आहे. मागच्या दीड वर्षात राज्यभरात 11 हजार 751 बालमृत्यूची नोंद झाली आहे. त्यापैकी 19 हजार 663 अर्भकांचा मृत्यू झाला आहे. तर 3 हजार 78 बालमृत्यूची (Child Death) नोंद झाली आहे. राज्यात महत्त्वाच्या पाच शहरात बालमृत्यूचं प्रमाण अधिक असल्याने चिंतेचं वातावरण आहे. विशेष म्हणजे अत्यंत कमी बालमृत्यूची नोंद सिंधूदुर्ग जिल्ह्यामध्ये झाली आहे. शासनाकडून (Maharashtra Government) महिला आणि बाल आरोग्य सुधारावे यासाठी विविध योजना राबविल्या जातात. तसेच या योजनांवर दरवर्षी कोट्यवधींचा खर्च होत असतो. तरीही बालमृत्यू होत असल्याने चिंतेचा विषय झालेला आहे.

राज्यातील काही जिल्ह्यातील बालमृत्यूची आकडेवारी

नागपूरमध्ये – 1 हजार 741,

औरंगाबाद – 1 हजार 349,

हे सुद्धा वाचा

नाशिक – 1 हजार 127,

पुणे – 1 हजार 181

अकोला – 1 हजार 94

नंदुरबार – 1 हजार 26

ठाणे – 1 हजार 15

राज्यात चांगल्या उपाय योजनांची गरज

मागच्या 17 महिन्यात 0 ते 5 वयोगटातील ही आकडेवारी मिळाली आहे. यामध्ये सर्वात जास्त बालमृत्यू मुंबई आणि मुंबई उपनगरात झाले असून ते 1 हजार 898 आहेत. त्यामुळे सगळ्या अधिक बालमृत्यू हे मुंबई आणि मुंबई उपनगरात झाले आहेत. नंदुरबार व अकोला हे जिल्हे वगळल्यास उर्वरित जिल्हे प्रगत आहेत आहेत. या जिल्ह्यात बालमृत्यूचे प्रमाण 43 टक्के आहे. बालकांच्या पोषणासाठी राज्य शासन विविध योजना राबवित असते. पण त्याचा परिणाम कोणत्याही शहरात होत असल्याचे दिसून येत नाही. पण दुसऱ्या बाजूला कोकणातील सिंधुदुर्गमध्ये सर्वात कमी 64 व मराठवाड्यातील वाशिम 89, लातूरमध्ये 125 बालमृत्यू झाले आहेत. राज्याचा विचार केल्यास राज्यात भविष्यात बालमृत्यू रोखण्यासाठी चांगल्या उपाय योजना करणं गरजेचं आहे.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.