आषाढी वारीसाठी 3 हजार पोलिसांचा बंदोबस्त, वाखरी ते इसबावीपर्यंत 40 वारकऱ्यांसह 10 पालख्यांना परवानगी

आषाढी वारीच्या अनुषंगाने पंढरपुरात 3 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तर नियमांसह मानाच्या 10 पालख्यांना परवानगी देण्यात आल्याची माहिती सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

आषाढी वारीसाठी 3 हजार पोलिसांचा बंदोबस्त, वाखरी ते इसबावीपर्यंत 40 वारकऱ्यांसह 10 पालख्यांना परवानगी
Ashadi Wari (फाईल फोटो)

सोलापूर : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून संतांच्या पालख्या आता पंढरीकडे वाटचाल करतील. त्यापार्श्वभूमीवर आषाढी वारीच्या अनुषंगाने पंढरपुरात 3 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तर नियमांसह मानाच्या 10 पालख्यांना परवानगी देण्यात आल्याची माहिती सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. वाखरी ते इसबावी दरम्यान माराच्या 10 पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे. प्रत्येक पालखीसोबत 40 वारकऱ्यांना पालख्यांसोबत सहभागी होता येणार आहे. मात्र, इसबावी इथून प्रत्येक पालखीतील 2 व्यक्तींना पुढे पंढरपुरात प्रवेश दिला जाणार असल्याची माहितीही तेजस्वी सातपुते यांनी दिली आहे. (3000 police deployed in Pandharpur on the backdrop of Ashadi Wari)

पंढरपूर प्रशासनाची महत्वाची बैठक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर प्रशासनाने आज महत्वाची बैठक घेतली. कोरोना संकटाामुळे यंदाची आषाढी एकादशीही प्रतिकात्मक पद्धतीने साजरी करण्यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. आषाढी एकादशीपूर्वी काय तयारी करावी लागेल, या अनुषंगाने आज पंढरपुरातील सर्व विभाग प्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीत प्रांताधिकाऱ्यांनी सर्व अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना दिल्या.

आषाढी वारीसाठी सरकारने मान्यता दिलेल्या पालख्या आणि पालख्यांसोबत वारकरी पालखीतळावर आल्यानंतर तिथून पंढरपूरकडे येईपर्यंत, एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत काय काळजी घ्यायची यासंदर्भातील सूचना प्रांताधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. या काळात बाहेरुन आलेल्या वारकऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येईल. पंढरपुरातील रस्ते दुरुस्ती करण्यात येणार आहेत. वारकरी ज्या ज्या ठिकाणी थांबणार तो मठ आणि परिसराचं निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्या ठिकाणी थांबतील त्या ठिकाणचा सर्व परिसर, इमारतींचंही निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत.

प्रांताधिकाऱ्यांच्या सर्व विभागांना सूचना

राज्यभरातून येणाऱ्या वारकऱ्यांसाठी स्वच्छतागृह, तसंच पंढरपुरात स्वच्छता ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एकादशी ते पौर्णिमा या कालावधीत शासनाने परवानगी दिलेल्या संतांच्या पालख्या आणि पादुका पंढरपूरमध्ये असणार आहेत. या काळामध्ये पोलीस विभागाने काय काळजी घ्यायची? तसेच नगरप्रदक्षिणा, चंद्रभागा स्नान याबाबतही काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सूचना प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या आहेत.

संबंधित बातम्या :

मानाच्या 10 पालख्यांना आषाढी वारीसाठी परवानगी; अजित पवारांची मोठी घोषणा

किमान 100 वारकऱ्यांसोबत पायी वारीला जाण्याची परवानगी द्या; आळंदी देवस्थानाची मागणी

3000 police deployed in Pandharpur on the backdrop of Ashadi Wari

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI