मंत्र्याला वाचवण्यासाठी मंत्रालयाच्या 6 व्या मजल्यातील केबिनमध्ये दडलंय काय?, आशिष शेलार यांचा सवाल

मंत्र्याला वाचवण्यासाठी मंत्रालयाच्या 6 व्या मजल्यातील केबिनमध्ये दडलंय काय?, असा सवालही आशिष शेलार यांनी उपस्थित केलाय.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:37 PM, 23 Feb 2021
मंत्र्याला वाचवण्यासाठी मंत्रालयाच्या 6 व्या मजल्यातील केबिनमध्ये दडलंय काय?, आशिष शेलार यांचा सवाल
ashish shelar

मुंबईः पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी पहिल्यांदाच संजय राठोड यांनी मीडियासमोर येऊन खुलासा केलाय. त्यानंतर आता भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनीही संजय राठोड यांच्यावर हल्लाबोल केलाय. मंत्र्याला वाचवण्यासाठी मंत्रालयाच्या 6 व्या मजल्यातील केबिनमध्ये दडलंय काय?, असा सवालही आशिष शेलार यांनी उपस्थित केलाय. आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी संजय राठोड यांच्यावर जोरदार प्रहार केलाय. (Ashish Shelar Criticize On Sanjay Rathod Pooja Chavan Death)

त्याची गुप्तवार्ता विभागाला माहिती होती की नाही?: आशिष शेलार

संजय राठोड यांचा सार्वजनिक जाहीर कार्यक्रम होतोच कसा?, त्याला परवानगी मिळते का आणि ती कशी मिळते. तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी जमली, त्याची गुप्तवार्ता विभागाला माहिती होती की नाही?. ज्या भगिनीच्या नावानं संशय उभं राहिलंय ती भगिनीही त्याच समाजाची आहे. त्यामुळे मोठं कारस्थान या प्रकारच्या गुन्ह्याच्या चौकशीला दडपण्याठी होतंय. आतापर्यंत पोलीस यंत्रणेवर राजकीय दबाव होता, आता पोलीस यंत्रणेवर आम्ही सामाजिक दबाव टाकू, असंही त्यांनी दाखवून दिलंय, असं टीकास्त्रही आशिष शेलार यांनी सोडलंय.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मिळून या प्रकरणात खुलासा करावाः आशिष शेलार

हिंमत असेल तर चौकशी करून दाखवा, अशा प्रकारचा संदेश दिला जातोय. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मिळून या प्रकरणात नेमक्या काय गोष्टी गुलदस्त्यात आहेत, त्या समोर आणणं आवश्यक आहे. पोलिसांवर खूप मोठा दबाव आहे, देवेंद्र फडणवीसांनीही ते स्पष्ट केलंय. ज्या भोवती संशयाचं भवरं फिरतंय तो राज्याचा मंत्री आहे, असंही आशिष शेलार म्हणालेत.

कुटुंबीयांची वक्तव्येही प्रचंड मानसिक दबावाखालीः आशिष शेलार

ते सन्माननीय मंत्री स्वस्तः बोलत नाहीत, समोर येत नाहीत. स्वतः सोशल मीडियावरून त्याबद्दलच स्पष्टीकरण देत नाहीत. त्यांना कुठल्या पोलीस यंत्रणेनं बोलावल्याची माहिती समोर येत नाही. ते स्वतः पोलीस यंत्रणेसमोर जाऊन माहिती देतील, असं काहीही करत नाहीत. पीडितेच्या कुटुंबीयांची वक्तव्येही प्रचंड मानसिक दबावाखाली केलेली दिसत आहेत. कायदेशीर प्रक्रियेनुसार गुन्हा नोंद केलाय की नाही तेच कळत नाही. फॉरेन्सिक लॅबसह इतर चौकशी झाली आहे की नाही याबद्दल स्पष्टता नाही, अशी टीकाही आशिष शेलार यांनी केलीय.

मंत्रालयाच्या 6 मजल्यातील केबिनमध्ये दडलंय काय?: आशिष शेलार

त्या एका व्यक्तीचं नाव वारंवार टेलिफोनिक टॉकमध्ये येतंय. त्या व्यक्तीची उपलब्धता आहे की नाही, तो गायब आहे की नाही ते कळायला मार्ग नाही. ह्या टोपीखाली दडलय काय याच प्रमाणे ह्या मंत्र्याला वाचवण्यासाठी मंत्रालयाच्या 6 मजल्यातील केबिनमध्ये दडलंय काय हे समोर यायला हवं, असंही आशिष शेलारांनी अधोरेखित केलंय. बाळासाहेबांची शिवसेना माता भगिनींचं रक्षण हे प्रथम कर्तव्य असं मानणारी होती. मात्र पूजा चव्हाण प्रकरणात संपूर्ण शिवसेना चिडीचूप आहे, असंही ते म्हणालेत.

संबंधित बातम्या  

पूजा चव्हाणच्या मृत्यूवरुन घाणेरडं राजकारण, संजय राठोडांची पहिली प्रतिक्रिया

Ashish Shelar Criticize On Sanjay Rathod Pooja Chavan Death