अशोक चव्हाण हायकमांडला पैसे पुरवण्यात व्यस्त : पियुष गोयल

अशोक चव्हाण हायकमांडला पैसे पुरवण्यात व्यस्त : पियुष गोयल

नांदेड : भाजप मला राजकीयदृष्ट्या संपवायला निघालीय, माझ्या मतदारसंघासाठी निधी देत नाहीत, असा आरोप काँग्रेसचे नांदेडचे उमेदवार अशोक चव्हाण यांनी नुकताच केला. मात्र अशोक चव्हाण मतदारसंघाच्या विकासासाठी कसा देखावा करतात याचा भांडाफोडच रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केलाय.

नांदेड लोकसभेचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण हे मागील पाच वर्षात कधीही काम घेऊन आपल्याला भेटायला आले नाहीत. मला संसदेतही त्यांचे कधी दर्शन झाले नाही. यावरून त्यांना या भागाच्या विकासाची चिंता नसल्याचं स्पष्ट होतं, असा आरोप रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केला. ते नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद इथे प्रचारसभेत बोलत होते.

‘आदर्श’ खासदार हे घोटाळे करून हायकमांडला पैसे देण्यातच सगळा विकास विसरून गेले, असा गंभीर आरोपही गोयल यांनी केला. अशोक चव्हाण सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही आहेत. पण भाजपने त्यांना नांदेडमध्येच गुंतवून ठेवलंय. नांदेडमध्ये भाजप-शिवसेना युतीकडून त्यांच्यासमोर प्रताप पाटील चिखलीकर यांचं आव्हान आहे.

महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यात म्हणजे 18 एप्रिलला 10 जागांसाठी मतदान होईल. ज्यात बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, बीड, परभणी, लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूरचा समावेश आहे.

व्हिडीओ पाहा :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *