अशोक चव्हाण हे विश्व हिंदू परिषदेचे सदस्य आहेत : प्रकाश आंबेडकर

नांदेड : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि नांदेडचे खासदार अशोक चव्हाण हे विश्व हिंदू परिषदेचे सदस्य आहेत, असा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. चव्हाण यांनी याबाबत खुलासा करावा, अशी मागणी आंबेडकर यांनी केली. नांदेड जिल्ह्यातील नरसी इथल्या सभेत आंबेडकर बोलत होते. रखरखत्या उन्हात आंबडेकर यांच्या सभेसाठी मोठी गर्दी झाली होती. याच सभेत …

prakash ambedkar, अशोक चव्हाण हे विश्व हिंदू परिषदेचे सदस्य आहेत : प्रकाश आंबेडकर

नांदेड : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि नांदेडचे खासदार अशोक चव्हाण हे विश्व हिंदू परिषदेचे सदस्य आहेत, असा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. चव्हाण यांनी याबाबत खुलासा करावा, अशी मागणी आंबेडकर यांनी केली. नांदेड जिल्ह्यातील नरसी इथल्या सभेत आंबेडकर बोलत होते.

रखरखत्या उन्हात आंबडेकर यांच्या सभेसाठी मोठी गर्दी झाली होती. याच सभेत भाजपाध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोके असल्याचा घणाघातही त्यांनी केली. कमजोर लोकांना लुटण्याचं काम हे बोके करतायत असंही आंबेडकर यावेळी म्हणाले. या सभेत आंबेडकर यांनी अशोक चव्हाण यांना लक्ष्य करत, त्यांच्या साखर कारखान्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. आमची सत्ता आली तर चव्हाण यांनी विकत घेतलेले साखर कारखाने पुन्हा सहकारी तत्वावर करु, असं ते म्हणाले.

VIDEO : प्रकाश आंबेडकर यांचं संपूर्ण भाषण

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *