Maratha Reservation | आरक्षणासाठी सरकारने जोर लावायचा म्हणजे काय करायचं?; अशोक चव्हाणांचा सवाल

मराठा आरक्षणावर उद्या सुनावणी आहे. त्यामुळे सरकारने जोर लावला पाहिजे, असं आवाहन भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केलं होतं. त्यावर सरकारने जोर लावायचा म्हणजे नेमकं काय करायचं?; असा सवाल मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.

Maratha Reservation | आरक्षणासाठी सरकारने जोर लावायचा म्हणजे काय करायचं?; अशोक चव्हाणांचा सवाल

औरंगाबाद: मराठा आरक्षणावर उद्या सुनावणी आहे. त्यामुळे सरकारने जोर लावला पाहिजे, असं आवाहन भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलं होतं. त्यावर सरकारने जोर लावायचा म्हणजे नेमकं काय करायचं?; असा सवाल मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. मराठा आरक्षणाची सुनावणी उद्या ज्या खंडपीठासमोर होणार आहे. ते आम्हाला मान्य नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. (ashok chavan reaction on chhatrapati sambhaji raje statement on maratha reservation)

औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना अशोक चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. मराठा आरक्षणाचा विषय न्यायप्रविष्ठ असून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. हे आरक्षण रद्द झालेलं नाही. त्यावर अंतरिम स्थगिती आली आहे. या प्रकरणात काही लोकांनी हस्तक्षेप याचिका दाखल केल्या आहेत. अशा 8-10 याचिका कोर्टात प्रलंबित आहेत, असं सांगतानाच मराठा आरक्षणसााठी जोर लावायचा म्हणजे नेमकं काय करायचं?, असा सवाल चव्हाण यांनी केला.

मराठा आरक्षणाची सुनावणी उद्या ज्या खंडपीठासमोर होणार आहे. ते आम्हाला मान्य नाही. ही सुनावणी घटनापीठासमोरच व्हावी. ही आमचीच नव्हे तर सर्वच याचिकाकर्त्यांची मागणी आहे. आमची भूमिका या पीठासमोर जाणार नाही, असंही ते म्हणाले. मराठा आरक्षणावर आम्हाला कोणतंही राजकारण करायचं नाही. हा कायदा पारीत झाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. त्यावर आम्ही ठाम आहोत. हा प्रश्न कोणत्याही परिस्थितीत मार्गी लागला पाहिजे. माझ्या म्हणण्याचा कोणीही उलटा अर्थ काढू नये. स्थगिती उठवायची की नाही हा निर्णय न्यायालयाचा आहे. उद्या आम्ही कोर्टाला विनंती करू, असंही ते म्हणाले.

काय म्हणाले होते संभाजीराजे?

मराठा आरक्षणावर उद्या सुनावणी होणार आहे. त्यामुळे काय जोर लावायचा तो लावा आणि हे आरक्षण टिकवा, समाजाला न्याय मिळाला पाहिजे, अशी राज्य सरकार आणि आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना माझी विनंती आहे, असं संभाजीराजे म्हणाले होते. मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचं सिद्ध झालं आहे. आता काही लोक म्हणतात या समाजाला आरक्षण नको, तर काही लोक म्हणतात ओबीसीमध्ये आरक्षण घेऊ. पण या घडीला तरी आपलं लक्ष फक्त एसईबीसी आरक्षणाकडे असलं पाहिजे. त्यामुळे दुसरी लाईन पकडायची नाही. आता फक्त एसईबीसी आरक्षण कसं टिकवायचं याचाच विचार करायचा आहे, असं ते म्हणाले होते. (ashok chavan reaction on chhatrapati sambhaji raje statement on maratha reservation)

संबंधित बातम्या: 

Maratha Reservation | मराठा आरक्षणावर घटनापीठासमोर सुनावणी व्हावी, ही राज्य सरकारची भूमिका: अशोक चव्हाण

मला मराठा आणि बहुजन समाजाचा शिपाई व्हायचंय: संभाजीराजे

आता दुसरी लाईन पकडायची नाही, एसईबीसी आरक्षणच टिकवायचं; संभाजीराजेंचा निर्धार

(ashok chavan reaction on chhatrapati sambhaji raje statement on maratha reservation)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *