समीर वानखेडेंवरील आरोप आर्यन खानच्या पथ्यावर, चौकशीची गती मंदावण्याची शक्यता, जामीनही मिळणार ?

आता आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाची चौकशी मंदावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा फायदा आर्यन खान आणि अभिनेत्री अनन्या पांडे यांना जामीन मिळवण्यासाठी होऊ शकतो शकतो, अशी शक्यता घटनातज्ज्ञ असीम सरोदे यांनी व्यक्त केली.

समीर वानखेडेंवरील आरोप आर्यन खानच्या पथ्यावर, चौकशीची गती मंदावण्याची शक्यता, जामीनही मिळणार ?
आर्यन खान

पुणे : क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केल्यानंतर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे चांगलेच चर्चेत आले. मात्र याच वानखेडेंवर आता गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या आरोंपामुळे आता आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाची चौकशी मंदावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा फायदा आर्यन खान आणि अभिनेत्री अनन्या पांडे यांना जामीन मिळवण्यासाठी होऊ शकतो शकतो, अशी शक्यता घटनातज्ज्ञ असीम सरोदे यांनी व्यक्त केली.

चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यावरच गंभीर आरोप

समीर वानखेडेंवर केलेले आरोप शंकास्पद आहेत. याचा फायदा आर्यन खान आणि अनन्या पांडे यांना जामीन मिळवण्यासाठी होऊ शकतो. कारण आता चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यावरच गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. या सर्व प्रक्रियेत यंत्रणांचा मात्र राजकीय वापर झाला, असे मत सरोदे यांनी व्यक्त केले.

चॅटच्या आधारे जामीन नाकारणं चुकीचं

तसेच पुढे बोलताना त्यांनी आर्यन खानला जामीन तसेच ड्रग्ज प्रकरणात पुडे काय होऊ शकतं याबद्दल मत व्यक्त केलं आहे. व्हॉट्सअॅप चॅटिंगच्या आधारे जामीन नाकारणं हे कायदेशीरदृट्या चुकीचं असल्याचं सरोदे म्हणाले. तसेच या सगळ्या प्रक्रियेत यंत्रणांचा मात्र राजकीय वापर झाला आहे. चॅटच्या आधारे जामीन नाकारणं हे कायदेशीरदृट्या चुकीचं आहे. आता अनन्या पांडेनेदेखील तब्येत खराब असल्याचा अर्ज एनसीबीला दिला आहे. त्यामुळे एनसीबी आता तिला चौकशीसाठी बोलावणार नाही. या सर्व कारणांमुले चौकशीची गती मंदावू शकते, असंही सरोदे यांनी सांगितलं.

समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप

ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या आर्यन खानची चौकशी समीर वानखेडे यांच्यामार्फत होत आहे. मात्र समीर वानखेडे यांच्यावर मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केलेले आहेत. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी वानखेडे यांचा जन्म दाखला ट्विटरवर पोस्ट केला आहे. “Sameer Dawood Wankhede का यहां से शुरू हुआ फर्जीवाड़ा” असं ट्वीट करत काही कागदपत्रंही त्यांनी शेअर केली आहेत. समीर दाऊद वानखेडे याने फर्जीवाडा करुन नोकरी कशी मिळवली आहे, हे जातप्रमाणपत्र शेअर करत सांगितलंय.

असं झालं धर्मांतर

समीर वानखेडेच्या जन्माच्या दाखल्यावर वडिलांचे नाव दाऊद आहे. त्यांचा धर्म मुस्लिम आहे. त्या दाखल्यावर खोडखोड केलीय. हा दाखला खोटा असेल तर खरा दाखला कोणता आहे? त्यांनी समोर आणावा. समीर वानखेडेच्या वडिलांनी धर्मांतर केलं. दोन मुलं जन्माला आली. त्यांचे जन्माचे दाखले आले आणि त्यांनतर वडिलांनी धर्मांतर लपून ठेवलं. नोकरी केली तिथे कोणताही पुरावा दिला नाही, असं मलिक यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसात धर्माच्या आड घेऊन प्रचार सुरू झाला होता. पण लोकांना माहीत नव्हतं हा व्यक्ती जन्मापासून आजपर्यंत मुस्लिम आहे. ते तपासात पुढे येईल, असंही मलिक म्हणालेले आहेत.

इतर बातम्या :

‘ती’ देहव्यापार करायचीच, बहिणीलाही त्यात ढकललं, विरोध केल्याने संपवलं, ‘त्या’ कुजलेल्या मृतदेहाचं गूढ अखेर उकललं

बायकोने अबोला धरल्यामुळे खट्टू, पोलीस कॉन्स्टेबल पतीची विष पिऊन आत्महत्या

दीडशहाण्या बाबाचे 14 महिन्यांच्या बाळावर घरीच चुकीचे उपचार; मुलीचा मृत्यू अन् कसाई बापाला बेड्या!

(asim sarode sadi aryan khan may get bail in cruise ravi and drug party case)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI