नागपुरात रिक्षावाल्यांची पोलिसाला मारहाण, लातुरात पोलिसाला टेम्पोने चिरडलं

लातूर/नागपूर : आरोपींना धाकात ठेवणाऱ्या पोलिसांचा धाक उरला की नाही? असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. हा प्रश्न उपस्थित करण्याचं कारण म्हणजे, राज्यात पोलिसांवर हल्ल्लाच्या वाढत्या घटना. नागपूर आणि लातूरमधील घटना पाहिल्या, तर सध्या पोलिसांची असुरक्षितता लक्षात येईल. नागपूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक पोलिसांवर हल्ला झाला. तर लातूरमध्ये एका पोलिसाला भरधाव टेम्पोने चिरडलं. नागपूरच्या गणेशपेठ बस …

नागपुरात रिक्षावाल्यांची पोलिसाला मारहाण, लातुरात पोलिसाला टेम्पोने चिरडलं

लातूर/नागपूर : आरोपींना धाकात ठेवणाऱ्या पोलिसांचा धाक उरला की नाही? असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. हा प्रश्न उपस्थित करण्याचं कारण म्हणजे, राज्यात पोलिसांवर हल्ल्लाच्या वाढत्या घटना. नागपूर आणि लातूरमधील घटना पाहिल्या, तर सध्या पोलिसांची असुरक्षितता लक्षात येईल. नागपूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक पोलिसांवर हल्ला झाला. तर लातूरमध्ये एका पोलिसाला भरधाव टेम्पोने चिरडलं.

नागपूरच्या गणेशपेठ बस स्थानक हा भाग गर्दीचा परीसर आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या परिसरात रिक्षा चालक राजरोसपणे रस्त्याच्या कडेला रिक्षा लावतात. अशीच एक रिक्षा रस्त्याच्या कडेला लावलेली असताना, वाहतूक पोलिसांनी या रिक्षाचालकाला हटकलं. त्यानंतर रिक्षाचालकाने हुज्जत घालत, पोलिसांनाच मारहाण करायला सुरूवात केली. विशेष म्हणजे, तिथे उपस्थित असलेल्या इतर रिक्षाचालकांनी देखील पोलिसांवर हात साफ केले. या हल्ल्यात दोन पोलीस शिपाई जखमी झाले असून हल्लेखोर सोनू कांबळे आणि मयूर राजूरकर याला अटक करण्यात आली.

नागपुरात पोलिसांना मारहाण झाली असताना, तिकडे लातुरात मात्र एका पोलिसाल टेम्पोखाली चिरडल्याची घटना घडली. जिल्ह्यातल्या घरणी येथील महामार्गावर नळेगाव टी-पॉईंटवर नागेश चौधरी आणि त्यांचे सहकारी वाहनांची तपासणी करत होते. अगदी याच वेळेला चाकूरकडून लातूरकडे जाणाऱ्या टेम्पोला रस्त्यावर थांबण्याचा इशारा करणाऱ्या नागेश चौधरी यांना जोरदार धडक दिली. मुजोर टेम्पोचालकाने टेम्पो अंगावरून नेल्याने चौधरी गंभीर यांचा जागीच मृत्यू झाला. चौधरी यांना धडक दिल्यानंतर टेम्पोचालक फरार झाला आहे.

या दोन्ही घटनांमुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. कर्तव्यात असतानाच काही मुजोर लोकांमुळे पोलिसांना जीव गमावावा लागत असल्याचं चित्रं आहे. त्यामुळे पोलिसांनी वेळीच अशा मुजोर प्रवृत्तींना ठेचण्याची गरज आहे. तरंच गुन्हेगारांमध्ये पोलिसांची वचक आणि कायद्याची भीती कायम राहिल.

VIDEO : नाशिक । मैत्रिणींची हौस पूर्ण करण्यासाठी दोन अल्पवयीन मुलं बनली चोर

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *