नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयासमोरच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मात्र बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी वेळीच धाव घेऊन या तरुणाला ताब्यात घेतले.

  • हर्षल भदाणे पाटील, टीव्ही 9 मराठी, नवी मुंबई
  • Published On - 18:50 PM, 21 Jan 2021
नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयासमोरच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

नवी मुंबईः राष्ट्रवादीच्या घणसोली येथील नितीन रांजणे या माथाडी कामगाराची विनयभंगप्रकरणी तक्रार करण्यात आलीय. मात्र मला खोट्या गुन्ह्यात गोवल्याचा आरोप करत थेट नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयासमोर त्या तरुणानं डिझेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्यानं खळबळ उडालीय. मात्र बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी वेळीच धाव घेऊन या तरुणाला ताब्यात घेतले. (Attempt To Commit Suicide In Front Of Navi Mumbai Police Commissioner Office)

मला खोट्या विनयभंग प्रकरणात गोवत असल्याची तक्रार नितीन रांजणे यांनी केली होती. त्यानंतर त्यानं कोपरखैरणे पोलीस राजकीय दबावाखाली खोटी कारवाई करत असल्याची तक्रार करत आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलीस एका मोठ्या नेत्याच्या दबावामुळे मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा थेट आरोप त्या तरुणानं केलाय.

पोलिसांवरही दबाव आणला जात असल्याचा गंभीर आरोप

मनपा निवडणुकीत अडसर नको म्हणून अडकवले जात असल्याचे नितीन रांजणेनं म्हटलेय. यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयासमोर अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र बंदोबस्तावरील पोलिसांनी या तरुणाला अडवून ताब्यात घेतले. विशेष म्हणजे राष्ट्रवादी पक्षातच कार्यरत असलेल्या नितीन रांजणे हे माथाडी कामगार असून, पोलिसांवरही दबाव आणला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. मात्र पोलीस आता नितीन रांजणे यांनी केलेल्या आरोपाची चौकशी करत आहे. सध्या नितीन रांजणे याला पोलिसांनी ताब्यात घेतलेय.

नितीन रांजणे नवी मुंबईतील घणसोली प्रभागातून इच्छुक उमेदवार

नेत्याच्या दबावाने खोट्या पोलीस तक्रारी करत असल्याची कैफियत पोलीस आयुक्तांकडे करून देखील याकडे दुर्लक्ष केल्याने हे पाऊल उचलले असल्याची प्रतिक्रिया या तरुणाने व्यक्त केली. येऊ घातलेल्या नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नितीन रांजणे घणसोली प्रभागातून इच्छुक उमेदवार असल्याचे समजते. मात्र तो नेता कोण याबाबत चर्चा सुरू झालीय.

संबंधित बातम्या

मराठा आरक्षणासाठी तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, औरंगाबादेतील धक्कादायक घटना

आई-पप्पा माफ करा, फेसबुक पोस्ट लिहून पुण्यातील तरुणी आत्महत्येसाठी घराबाहेर, पुढे काय घडलं?

Attempt To Commit Suicide In Front Of Navi Mumbai Police Commissioner Office