कोरोना रुग्णाचा मृतदेह रोखणं महागात, चौकशीनंतर रुग्णालयाला दणका, कोव्हिड सेंटरची मान्यता रद्द

औरंगाबादमधील बजाजनगर परिसरातील ममता हॉस्पिटलच्या कोविड सेंटरची मान्यता रद्द करण्यात आलेली आहे. कोरोना रुग्णाचा मृतदेह रोखणं रुग्णालयाला चांगलंच महागात पडलंय. (aurangabad mamata memorial hospital derecognized After enquiry)

कोरोना रुग्णाचा मृतदेह रोखणं महागात, चौकशीनंतर रुग्णालयाला दणका, कोव्हिड सेंटरची मान्यता रद्द
औरंगाबादमधील बजाजनगर परिसरातील ममता हॉस्पिटलच्या कोविड सेंटरची मान्यता रद्द करण्यात आलेली आहे.

औरंगाबाद  : शहरातील बजाजनगर परिसरातील ममता हॉस्पिटलच्या कोविड सेंटरची मान्यता रद्द करण्यात आलेली आहे. कोरोना रुग्णाचा मृतदेह रोखणं रुग्णालयाला चांगलंच महागात पडलंय. तक्रारीनंतर केवळ 18 तासांत रुग्णालयाची मान्यता अखेर रद्द करण्यात आलेली आहे. चौकशीअंती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ममता हॉस्पिटलच्या कोविड सेंटरची मान्यता रद्द केली. (aurangabad mamata memorial hospital derecognized After enquiry)

रुग्ण न्याय हक्क परिषदेची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

ममता हॉस्पिटलच्या विरोधात रुग्ण न्याय हक्क परिषदेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कोविड सेंटरची मान्यता रद्द करावी, अशी पुराव्यानिशी मागणी केली होती. सेंटर चालू करताना आवश्यक परवानग्या नसतानाही रुग्णालय सुरु होतं तर गोरगरिबांची लाखो रुपयांची लूट रुग्णालय प्रशासन करत असल्याचं तक्रारीत म्हटलं होतं.

सव्वा लाख रुपयांसाठी रुग्णालयाने कोरोना रुग्णाचा मृतदेह रोखल्याचा आरोप

सव्वा लाख रुपयांसाठी रुग्णालयाने कोरोना रुग्णाचा मृतदेह रोखल्याचा आरोप तक्रारदारांनी केला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी तक्रारीची चौकशी करण्यासाठी डॉ. जी एम कुडलीकर, डॉ विजयकुमार वाघ, डॉ, प्रशांत दाते, डॉ. बामणे यांची चौकशी समिती नेमली होती.

चौकशी समितीचा अहवाल, जिल्हाधिकाऱ्यांची अॅक्शन

या चौकशी समितीने जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी अहवाल सादर केला. अहवालाची लगोलग दखल घेत अखेर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ममता हॉस्पिटलच्या कोविड सेंटरची मान्यता रद्द केली.

कलेक्टरसाहेबांचे नवे आदेश

सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरु असताना आंतररुग्ण म्हणून भरती असलेल्या रुग्णावर उपचार करुन झाल्यानंतर त्यांना सुट्टी देण्यात यावी तसंच 25 मे नंतर रुग्णालयामध्ये कोणत्याही नवीन कोरोना रुग्णास आंतररुग्ण म्हणून दाखल करण्यात येऊ नये, असे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत.

(aurangabad mamata memorial hospital derecognized After enquiry)

हे ही वाचा :

VIDEO: आता होम आयसोलेशन बंद, कोविड सेंटरमध्येच व्हावं लागणार भरती; राजेश टोपेंची मोठी माहिती

‘त्या’ रुग्णांचे साडे सतरा लाख रुपये परत करा; जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्याचे आदेश

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI