औरंगाबादेत तरुणाने टूथब्रश गिळला, शस्त्रक्रियेनंतर जीवदान

औरंगाबादमध्ये राहणाऱ्या 33 वर्षीय व्यक्तीने थेट टूथब्रश गिळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

औरंगाबादेत तरुणाने टूथब्रश गिळला, शस्त्रक्रियेनंतर जीवदान
औरंगाबादमध्ये तरुणाने गिळलेला टूथब्रश डॉक्टरांनी बाहेर काढला
Follow us
| Updated on: Dec 30, 2020 | 7:53 AM

औरंगाबाद : लहान मुलांनी बटण, गोट्या, खिळा, पिना अशा वस्तू गिळल्याच्या घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. मात्र औरंगाबादमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने गिळलेली वस्तू ऐकून कोणीही चकित होईल. औरंगाबादमध्ये राहणाऱ्या 33 वर्षीय व्यक्तीने थेट टूथब्रश गिळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (Aurangabad Man swallows toothbrush Doctors remove after surgery)

टूथब्रश गिळल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या पोटात कमालीच्या वेदना होऊ लागल्या. त्यामुळे डॉक्टरांकडे धाव घेण्यावाचून त्याच्याकडे पर्यायच नव्हता. डॉक्टरांनी सिटीस्कॅन करुन तरुणावर शस्त्रक्रिया केली.

सर्जरीमध्ये 33 वर्षीय तरुणाच्या पोटातून टूथब्रश बाहेर काढण्यात आला. हे पाहून डॉक्टरही अवाक झाले. तरुणाने गिळलेला टूथब्रश हा थोडाथोडका नव्हे, तर तब्बल अर्धा फूट लांबीचा होता. इतक्या लांबीचा टूथब्रश तरुणाने का आणि कसा गिळला, हा प्रश्न डॉक्टरांनाही पडला आहे. सर्जरीनंतर या रुग्णांची प्रकृती व्यवस्थित आहे.

नाणं गिळलेल्या चिमुरड्याला जीवदान

जून महिन्यात शहापूरला राहणाऱ्या आठ वर्षांच्या मुलाने खेळता-खेळता एक रुपयाचे नाणे गिळले होते. स्थानिक रुग्णालयांत एंडोस्कोप नसल्याचं कारण देत त्याच्यावर ऑपरेशन करण्यास डॉक्टरांनी असमर्थता दाखवली होती. मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास अॅम्ब्युलन्सने कुटुंब शहापूरहून परेलमधील केईएम रुग्णालयात पोहोचलं. कॉईन अन्ननलिकेत अडकल्याने जवळपास बारा तासापासून चिमुरडा अन्न-पाण्यावाचून होता. त्यामुळे त्याच्या जीवितालाही धोका निर्माण झाला होता.

कोरोना संसर्ग सर्वाधिक असल्याचा तो काळ होता. प्रोटोकॉलनुसार शस्त्रक्रिया करण्यापूर्वी रुग्णाची कोव्हीड चाचणी घेण्यात आली होती, मात्र चिमुकला बारा तासांपेक्षा अधिक काळ उपाशीपोटी असल्याने अहवाल येण्यापूर्वीच शस्त्रक्रिया करणे भाग होते. अखेर कोरोनाचा धोका पत्करुन चार ते पाच डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली आणि आठ वर्षांच्या मुलाने गिळलेले एक रुपयाचे नाणे अन्ननलिकेतून बाहेर काढले.

संबंधित बातम्या :

15 महिन्यांचं बाळ घरी खेळत असताना डोक्यावर टीव्ही पडून जखमी

माणुसकी जिंकली, कोरोना हरला! धोका पत्करुन चिमुरड्याच्या अन्ननलिकेतून नाणे काढले, केईएमच्या डॉक्टरांकडून जीवदान

(Aurangabad Man swallows toothbrush Doctors remove after surgery)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.