Aurangabad | MIM नेते अकबरुद्दीन ओवैसी औरंगाबादेत, धार्मिक स्थळांना भेटी, ओवैसींना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी

Aurangabad |  MIM नेते अकबरुद्दीन ओवैसी औरंगाबादेत, धार्मिक स्थळांना भेटी, ओवैसींना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी
एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवैसी आणि खासदार इम्तियाज जलील
Image Credit source: tv9 marathi

मनसेनं हिंदुत्वाची आग्रही भूमिका घेतल्यानंतर आता शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचीही जाहीर सभा औरंगाबादेत होणार आहे. या पार्श्वभूमीवर आता अकबरुद्दीन ओवैसी काय वक्तव्य करतात, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

दत्ता कानवटे

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

May 12, 2022 | 1:57 PM

औरंगाबादः एमआयएमचे तेलंगणाचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांचं औरंगाबादमध्ये कालच आगमन झालं असून आज ते शहरातील विविध धार्मिक स्थळांना ते भेटी देत आहेत. अकबरुद्दीन ओवैसी हे तेलंगणा येथील सालार ए मिल्लत एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष असून याच माध्यमातून औरंगाबादमध्ये (Aurangabad MIM) एक शाळेची उभारणी करण्यात येणार आहे. या शाळेच्या भूमीपूजन कार्यक्रमासाठी अकबरुद्दीन ओवैसी औरंगाबादेत आले असून एमआयएमने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी तर ‘आ रहा हू मै…’ अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर टाकून ओवैसी यांच्या औरंगाबाद दौऱ्याची ग्वाही दिली होती. त्यानंतर शहरात ओवैसी यांच्या दौऱ्याची चांगलीच वातावरणनिर्मिती करण्यात आली. आज अकबरुद्दीन ओवैसी हे औरंगाबदमध्ये दाखल झाले असून त्यांच्या स्वागताला शेकडो कार्यकर्ते हजर झाले. दुपारी चार वाजता त्यांच्या ट्रस्टच्या शाळेच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम होणार आहे.

MIM leaders in Aurangabad

अकबरुद्दीन ओवैसी यांना कार्यकर्त्यांचा गराडा

धार्मिक स्थळांना भेटी

औरंगाबादमध्ये आल्यानंतर अकबरुद्दीन औवैसी यांचं खासदार इम्तियाज जलील यांनी जंगी स्वागत केलं. त्यानंतर त्यांनी औरंगाबादमधील विविध धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. पाणचक्की परिसरातील हजरत सय्यद शाह दर्ग्यालाही त्यांनी भेट दिली. या दर्ग्यावर त्यांनी चादरही चढवली. त्यानंतर ते औरंगजेब कबरीलाही भेट दिली. खुलताबाद येथील औरंगजेब कबरीचं दर्शन घेतलं. यापूर्वी त्यांचे बंधू असदुद्दीन ओवैसी यांनीनी या कबरीचं दर्शन घेतलं होतं.

MIM leaders in Aurangabad

2015 मध्ये घोषणा, आज शाळेचं भूमीपूजन

2015 च्या महापालिका निवडणुकीच्या वेळी हैदराबादच्या धर्तीवर शहरात भव्य शाळा उभारण्याची घोषणा एमआयएमने केली होती. आज आठ वर्षानंतर या शाळेला मुहूर्त सापडले असून शाळेचं भूमीपूजन आज करण्यात येत आहे. हिमायत बाहेच्या शेजारी असलेल्या दोन एकर जागेवर शाळेच्या पाच मजली इमारतीच्या बांधकामाचं भूमीपूजन करण्यात येईल. नियोजीत शाळेच्या जागेची कालच खासदार इम्तियाज जलील यांनी पाहणी केली. तेलंगणाचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी हे कालच औरंगाबादेत दाखल झाले असून आज त्यांनी खुलताबाद येथील धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. भूमीपूजनानंतर ते हैदराबादला रवाना होतील.

भाषणाकडे साऱ्यांचे लक्ष

एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे लहान बंधू असलेले अकबरुद्दीन ओवैसी हेदेखील त्यांच्या अत्यंत वादग्रस्त भाषणासाठी प्रसिद्ध आहेत. औरंगाबादेत नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा झाली आहे. यात मुस्लिम मशीदींवरील भोंग्यांवर राज ठाकरे यांनी काही प्रक्षोभक विधानंही केल्याचं पोलिसांच्या अहवालात सिद्ध झालंय. तसेच मनसेनं हिंदुत्वाची आग्रही भूमिका घेतल्यानंतर आता शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचीही जाहीर सभा औरंगाबादेत होणार आहे. या पार्श्वभूमीवर आता अकबरुद्दीन ओवैसी काय वक्तव्य करतात, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें