Aurangabad | उस्मानाबाद स्वतंत्र विद्यापीठाची मागणी करणाऱ्यांना काळं फासलं, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात रिपब्लिकन सेना आक्रमक

रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीनं आज स्वतंत्र उस्मानाबाद विद्यापीठाची मागणी करणाऱ्या सिनेट मेंबरला काळं फासण्यात आलं.

Aurangabad | उस्मानाबाद स्वतंत्र विद्यापीठाची मागणी करणाऱ्यांना काळं फासलं, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात रिपब्लिकन सेना आक्रमक
स्वतंत्र विद्यापीठाची मागणी करणाऱ्या सिनेट सदस्याला काळं फासलं Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 27, 2022 | 4:55 PM

औरंगाबादः स्वतंत्र उस्मानाबाद (Osmanabad) विद्यापीठाची मागणी करणाऱ्यांविरोधात आज औरंगाबादमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) तीव्र आंदोलन करण्यात आलं. रिपब्लिकन विद्यार्थी सेनेनं ही मागणी करणाऱ्या सिनेट मेंबरला काळं फासलं. सिनेट मेंबर संजय निंबाळकर  (Sanjay Nimbalkar)यांनी स्वतंत्र विद्यापीठाची मागणी केली होती. मात्र उस्मानाबादमध्ये स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं महत्त्व कमी करण्याचा हा डाव असल्याचा आरोप रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीनं करण्यात आलं. तसंच नामांतराच्या लढ्यासाठी बलिदान देणाऱ्या नेत्यांचा हा अपमान असल्याचा आरोपही त्यांनी केला.

रिपब्लिकन सेनेचा इशारा काय?

नामांतरासाठी 17 वर्ष संघर्ष करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव विद्यापीठाला मिळालं असून काही जातीय वादी लोकांकडून उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ निर्माण करण्याचा घाट घातला जात आहे. हा नामांतर शहीदांचा अवमान आहे. तो आम्ही सहन करणार नाहीत. संजय निंबाळकर यांना आज रिपब्लिकन सेनेच्या वतीनं काळं फासण्यात आलं आहे. जी जी माणसं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे तुकडे करण्याचा प्रयत्न करतील, त्यांना रिपब्लिकन सेनेच्या वतीने धडा शिकवला जाईल, असा इशारा रिपब्लिकन विद्यार्थी सेनेने दिला आहे.

विद्यापीठात काही काळ तणाव

रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीनं आज स्वतंत्र उस्मानाबाद विद्यापीठाची मागणी करणाऱ्या सिनेट मेंबरला काळं फासण्यात आलं. त्यामुळे काही काळ विद्यापीठात तणाव निर्माण झाला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाविरोधात हा कट असल्याचा आरोप रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आला. दरम्यान आक्रमक झालेल्या रिपब्लिकन पक्षाच्या आंदोलनात हस्तक्षेप करून त्यांना वेळीच वातावरण शांत करण्यात आलं. यामुळे विद्यापीठ परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

Non Stop LIVE Update
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....