Aurangabad Drowned : औरंगाबादमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं तरुणाचा बळी! थरारक व्हिडीओही समोर

Aurangabad Youth Drowned Video : तरुण बुडतानाचा 36 सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये तरुण बुडताना दिसून आला आहे.

Aurangabad Drowned : औरंगाबादमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं तरुणाचा बळी! थरारक व्हिडीओही समोर
थरारक घटना कॅमेऱ्यात कैदImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 06, 2022 | 10:25 AM

औरंगाबाद : औरंगाबाद (Aurangabad Crime News) जिल्ह्यात पुराच्या पाण्यात युवक वाहून गेलाय. बाजार सावंगी येथे पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह (Dead Body) दुसऱ्या दिवशी आढळून आला आहे. अग्निशमन आणि आणीबाणी पथकाकडून तीन तासांच्या शोधकार्यानंतर तरुणाचा मृतदेह सापडलाय. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय. जोरदार पावसाने बाजार सावंगी येथील धांड नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला होता. नदीमधील पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढलेला होता. या प्रवाहाचा वेग इतका प्रचंड होता की त्यात बाजार सावंगी येथील तरुण भाऊसाहेब कारभारी नलावडे पुरात वाहून गेला. यात तरुणाचा मृत्यू झाला असून या संपूर्ण घटनेचा थरारक व्हिडीओही (Horrifying Video) समोर आला आहे. राज्यात पुराच्या पाण्यात वाहून जाऊन मृत्यू झाल्याच्या घटना सुरुच असल्याचं यामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. सध्या तरुणाचा वाहून जाताचा व्हिडीओ औरंगाबादेत व्हायरल झाला असून या व्हिडीओमध्ये अंगावर काटा आणणारी दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

व्हिडीओमध्ये काय दिसतं?

तरुण बुडतानाचा 36 सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये तरुण बुडताना दिसून आला आहे. तर दुसऱ्या काठावर उभ्या असलेल्या लोकांनी मोबाईल कॅमेऱ्यात ही घटना कैद केलीय. यामध्ये एका तरुणाचं शरीर पूर्णपणे नदीच्या प्रवाही पाण्यात बुडत असल्याचं दिसत असून त्याचे हात पाण्यावर दिसून आले आहेत.

हे सुद्धा वाचा

तो बचावासाठी हातपाय मारत असल्याचंही दिसलंय. दरम्यान, नदी काठच्या लोकांकडूनही आरडाओरडा करुन मदतीसाठी केविलवाणा प्रयत्न सुरु असल्याचं दिसून आलंय.

पाहा व्हिडीओ :

अखेर हा तरुण नदींच्या प्रचंड प्रवाही पाण्यात वाहून जातो. या बेपत्ता तरुणाचा शोध घेण्याचही अखेर यश आलं. पण या तरुणाचा जीव वाचू शकला नाही. पाण्यात बुडाल्यानं आणि गुदमरल्यामुळे या तरुणाचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं मृत्यू झालाय. या घटनेमुळे औरंगाबादेत हळहळ व्यक्त केली जातेय. तसंच नदीकाठच्या लोकांनाही काळजी घेण्याचं आवाहन केलं जातंय.

Non Stop LIVE Update
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.