सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी पत्रकार नवरदेव चक्क उंटावर स्वार

केजच्या अक्षय वरपे यांनी चक्क उंटावरून वरात काढली. उंटावरून वरात काढलेला व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. (Beed Groom Seat in Camel Corona Social Distance)

  • महेंद्रकुमार मुधोळकर, टीव्ही 9 मराठी, बीड
  • Published On - 22:42 PM, 3 Mar 2021
सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी पत्रकार नवरदेव चक्क उंटावर स्वार
Beed Groom Seat in Camel Corona Social Distance

बीड : विवाह सोहळ्यात सध्या नवरी मुलींकडून वऱ्हाडी मंडळींना अचंबित करणारे अनेक फंडे आपण पाहिले आहात. मात्र बीडमध्ये सध्या एका पत्रकार असलेल्या नवरदेवाची चर्चा जोरात सुरू आहे. सध्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे, आणि अशात लग्न सोहळ्यात कोरोनाचे नियमांची पायमल्ली होऊ नये म्हणून अक्षय वरपे यांनी चक्क उंटावरून वरात काढली. उंटावरून वरात काढलेला व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. (Beed Groom Seat in Camel Corona Social Distance)

विवाह म्हटल्यावर नवरदेवाला सोबत घेऊन जल्लोष करणारी मित्र मंडळी प्रत्येक ठिकाणी पहावयास मिळते.  मात्र पत्रकार म्हणून समाजात कार्यरत असताना आपल्यावर असलेली सामाजिक जबाबदारी एका पत्रकार नवरदेवाने चांगलीच पेलली आहे. कोरोना काळात मित्रांसोबत गर्दी नको म्हणून केज तालुक्यातील साळेगाव येथील अक्षय वरपे यांनी वरातीसाठी चक्क उंटावर बसने पसंत केले.

उस्मानाबाद जिल्ह्यातील खामसवाडी येथील ऐश्वर्या यांच्यासोबत अक्षय यांचा 21 फेब्रुवारी रोजी साळेगाव येथे विवाह पार पडला. अगदी सोशल डिस्टन्सिंगचे नियम तंतोतंत पाळत उंटावरून वरात निघाल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात धुमाकूळ घालतो आहे. त्यांच्या या अनोख्या वरातीची सध्या जिल्हाभरात चर्चा होत आहे.

कोरोना काळातही अक्षयची प्रशासनाला मदत

केज तालुकात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. यावेळी सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकार अक्षय वरपे, गौतम बचुटे, जय जोगदंड, ज्योतिराम बचुटे, बाळासाहेब बचुटे, ज्योतिकांत कळसकर यांनी प्रशासनाला  मदत म्हणून जनजागृतीचे काम हाती घेतले होते. कालांतराने या परिसरातील कोरोना बाधितांचा आकडा कमी झाला होता.

(Beed Groom Seat in Camel Corona Social Distance)

हे ही वाचा :

जळगावच्या महिला वसतीगृहातील घटनेच्या चौकशीसाठी चार महिला अधिकाऱ्यांची समिती, गृहमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय

नांदेडच्या कर्मचाऱ्याचा ‘देशमुखी’ थाट आणि अख्खा महाराष्ट्र ‘घोड्यावर’, वाचा महाराष्ट्रातली आजची चर्चित स्टोरी सविस्तर