भूक हिंदूंनाही लागते, सुषमा अंधारे असं का म्हणाल्यात

नोकरी हिंदूंनासुद्धा लागते. हिंदूंच्या माताभगिनी असुरक्षित आहेत.

भूक हिंदूंनाही लागते, सुषमा अंधारे असं का म्हणाल्यात
सुषमा अंधारे
Follow us
| Updated on: Nov 20, 2022 | 6:44 PM

औरंगाबाद : महागाई कमी का होत नाही. याच उत्तर भाजपनं द्यावं. भ्रष्टाचारावर किरीट सोमय्या बोलतात. ईडीच्या नोटिसी दाखवत आरोप केले होते. त्यात प्रताप जाधव, यशवंत जाधव, भावना गवळी, राधाकृष्ण विखे पाटील होते. यांच्यापैकी कुणावरतरी ईडीचे आरोपपत्र दाखल होणार आहे का. भावनिक मुद्दे करण्यापेक्षा लोकाभिमुख मुद्द्यांवर राजकारण करण्यास शिकणार आहात का, असा सवालही सुषमा अंधारे यांनी भाजपला विचारला.

सुषमा अंधारे म्हणाल्या, चलनी नोटांना जगात प्रतिष्ठा मिळणार का. यासाठी भाजपनं काय केलं आहे. कोणताही प्रश्न विचारला की, तो धर्मावर आणून ठेवणं हे भाजपचं कसब आहे. पण, देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांना हे समजलं पाहिजे की, भूक हिंदुंना सुद्धा लागते. नोकरी हिंदूंनासुद्धा लागते. हिंदूंच्या माताभगिनी असुरक्षित आहेत. महिला सुरक्षा, महागाई यावर भाजपनं कोणतं पाऊलं उचललं.

उपमुख्यमंत्री टोलवाटोलवीची उत्तरं देतात. महत्त्वाची खाती ही उपमुख्यमंत्र्यांकडंच आहेत. मुख्यमंत्री नावालाचं आहेत. त्यांना पोजीशन मिळाली पण, पॉवर नाही. पॉवर देवेंद्र फडणवीस यांच्याकडं आहे, तर पोजीशन ही एकनाथ शिंदे यांच्याकडं आहे. त्यामुळं ज्यांच्याकडं पॉवर गेम आहे आम्ही त्यांनाचं प्रश्न विचारणार, असंही सुषमा अंधारे यांनी सांगितलं.

सरकार स्थापन होऊन शंभर दिवस झालेत. धोरणात्मक निर्णय काय घेतला. जे निर्णय घेतले हे लोकप्रीय आहेत. आम्ही एका फोनवर काम करू शकतो. आम्ही आनंदाचा शिधा वाटतो. असं करून राज्याचे प्रश्न सुटत नाहीत, असंही सुषमा अंधारे म्हणाल्यात.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.