व्हीडिओ पाहा | शिक्षकदिनी प्रशांत बंब झाले गुरुजी, विद्यार्थ्यांना बाराखडी म्हणायला लावली, तर धक्काच ….

आमदार प्रशांत बंब यांनी आज शिक्षक दिनाचे औचित्य साधलं, औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक शाळांची झाडाझडती घेतली. या झाडाझडतीमध्ये शिक्षणाचा 90% दर्जा घसरण्याचा आरोप प्रशांत बंब यांनी केला आहे.

व्हीडिओ पाहा | शिक्षकदिनी प्रशांत बंब झाले गुरुजी, विद्यार्थ्यांना बाराखडी म्हणायला लावली, तर धक्काच ....
दत्ता कानवटे

| Edited By: आयेशा सय्यद

Sep 05, 2022 | 3:35 PM

औरंगाबाद : शिक्षक दिनाच्या (Teachers Day) पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यात आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) यांनी काही शाळा तपासल्या. आमदार प्रशांत बंब यांनी चक्क दुपारच्या वेळी मुलांना जी खिचडी दिली जाते, त्या खिचडीचा आस्वाद घेतला. शाळेतल्या एका छोट्या बाकावरती ते बसले, प्लेटमध्ये खिचडी घेऊन खिचडी खाल्ली, त्यांनी नक्की खिचडीची गुणवत्ता कशी आहे, हे सुद्धा तपासलं.

आमदार प्रशांत बंब यांनी आज शिक्षक दिनाचे औचित्य साधलं, औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक शाळांची झाडाझडती घेतली. या झाडाझडतीमध्ये शिक्षणाचा 90% दर्जा घसरण्याचा आरोप प्रशांत बंब यांनी केला आहे.

प्रशांत बंब यांनी वर्गात जाऊन विद्यार्थ्यांची धडे घेतले, त्यावेळेला अनेक विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञानाचे प्रश्न सुद्धा माहित नसल्याचे उघड झालं.

अनेक ठिकाणी विद्यार्थी अ आ ई ऊ सुद्धा येत नव्हते, तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांना पूर्ण उजळणी म्हणता येत नव्हती, त्यामुळे आमदार प्रशांत बंब यांच्यासमोरच शिक्षकांवर खजिल होण्याचीवेळ आली.

प्रशांत बंब यांनी मागील काही दिवसांपासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या शिक्षणाच्या दर्जावर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे.

बहुतांश शाळांमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत नाहीत, त्यामुळे अनेक पिढ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप प्रशांत बंब यांचा आहे. प्रशांत बंब यांना या प्रकरणात शिक्षकांच्या तीव्र विरोधाचाही सामना करावा लागते आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें