मोठी बातमी! फुटू नये म्हणून शिंदे गटाच्या आमदारांना आणखी 5 कोटी दिले; ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा धक्कादायक दावा

शिंदे गटाचे आमदार अस्वस्थ आहेत. हे आमदार कोणत्याही क्षणी फुटण्याची शक्यता आहे. ते फुटू नयेत म्हणून या आमदारांना पुन्हा प्रत्येकी 5 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

मोठी बातमी! फुटू नये म्हणून शिंदे गटाच्या आमदारांना आणखी 5 कोटी दिले; ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा धक्कादायक दावा
फुटू नये म्हणून शिंदे गटाच्या आमदारांना आणखी 5 कोटी दिले; ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा धक्कादायक दावाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 01, 2022 | 1:09 PM

औरंगाबाद : ठाकरे गटाच्या शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिंदे गटाचे आमदार अस्वस्थ आहेत. हे आमदार कोणत्याही क्षणी फुटण्याची शक्यता आहे. ते फुटू नयेत म्हणून या आमदारांना पुन्हा प्रत्येकी 5 कोटी रुपये देण्यात आले आहेत, असा गौप्यस्फोट चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. एका उद्योगपतीनेच आपल्याला ही माहिती दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे. खैरे यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

चंद्रकांत खैरे हे मीडियाशी संवाद साधत होते. या सरकारला शिवाजी महाराजांविषयी काही आस्था नाही. शेतकऱ्यांबद्दल कनवाळा नाही. केवळ आमदार पकडून ठेवायचे. त्यांना खोके द्यायचे एवढंच सुरू आहे. आताही त्यांनी काही आमदारांना पकडून ठेवले आहे. गुवाहाटीला काही खोके दिले काही लोकांना. पाच पाच खोके दिले असं म्हणतात. अशा पद्धतीने तिकडे लक्ष आहे. याबाबाचं काही इकडे लक्ष नाही, अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली.

हे सुद्धा वाचा

शेतकऱ्यांकडे या सरकारचं दुर्लक्ष आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू झाल्या आहेत. वीज बिल थकल्याने त्यांना पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतकरी तणावात आहेत. त्यांच्याकडे आत्महत्येशिवाय पर्याय नाही. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना आत्महत्या करू नका म्हणून आवाहन केलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होते. शेतकरी राजा जगला तर प्रजा जगेल आणि प्रजा जगली तरच राजा जगेल, असं शिवाजी महाराज सांगायचे. प्रजा जगली तरच राजा जगेल असं ते म्हणायचे. इतकं मोठं मन राज्याचं होतं. एवढा मोठा विचार होता. असं असतानाही राज्यपाल महाराजांचा अवमान करतात. ही काळी टोपी महाराष्ट्राचं काळं करायला आली की काय? असा संतप्त सवाल त्यांनी केला.

लोढा आणि भाजपचे त्रिवेदी महाराजांबद्दल बोलत असेल तर आम्हाला राग आला आहे. शिवसेना हळूहळू आक्रमकता दाखवेल आणि या सरकारला खाली खेचेल. हे खोके सरकार आहे. ते काहीही बरळत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.