जन्मभूमीचे वेड, लाखो रुपयांच्या नोकरीचा राजीनामा, ऑस्ट्रेलिया ते वाई दुचाकीने प्रवास

जन्मभूमीच्या ओढीने एका तरुणाने थेट लाखो रुपयांच्या नोकरीचा राजीनामा देत आपल्या जन्मभूमी म्हणजेच भारतात परतला (Australia to Wai Bike Journey) आहे.

  • Updated On - 9:07 am, Tue, 14 January 20 Edited By:
जन्मभूमीचे  वेड, लाखो रुपयांच्या नोकरीचा राजीनामा, ऑस्ट्रेलिया ते वाई दुचाकीने प्रवास

सातारा : जन्मभूमीच्या ओढीने एका तरुणाने थेट लाखो रुपयांच्या नोकरीचा राजीनामा देत आपल्या जन्मभूमी म्हणजेच भारतात परतला (Australia to Wai Bike Journey) आहे. विशेष म्हणजे हा तरुण भारतात विमानाने न येता त्याने थेट दुचाकीचा वापर केला आहे. ऑस्ट्रेलिया ते वाई असा 22 हजार किमीचा पल्ला त्याने पार केला. त्यामुळे गावकऱ्यांनीही त्याचे स्वागत गेले. हा पल्ला पार करण्यासाठी त्याला सहा महिन्यांचा कालवाधी लागला. जून 2019 मध्ये त्याने ऑस्ट्रेलियावरुन या प्रवासाची सुरुवात केली होती. असीम रणदिवे असं या (Australia to Wai Bike Journey) तरुणाचं नाव आहे.

असीम हा सिडनी येथे नोकरी करत होता. असीमचे वडील आयटी क्षेत्रात नोकरी करत असल्याने 1987 मध्ये ओमान देशात स्थायिक झाले. असीम रणदिवे याचे शिक्षण 1995 पर्यंत ओमान याठिकाणी झाले. त्यानंतर सिडनीत शिक्षण पूर्ण केल्यानंतर एका नामंकित आयटी कंपनीमध्ये नोकरी लागल्याने तो तेथेच स्थायिक झाला होता. नोकरी करत असताना आपल्या मायभूमी भारतात जाण्याची ओढ लागली होती. त्यातही महाराष्ट्रातील लोकांना जाणून घेण्याची आणि जन्मभूमी असणाऱ्या दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या वाई याठिकाणी जाण्याची उत्सुकता होती. त्यामुळे असीम भारतात परतला.

भारतात येण्याची ओढ निर्माण झाल्यानंतर असीमने दुचाकीवरुन सिडनी, रशिया, मंगोलिया, कजाकिस्तान, चीन, पाकिस्तान, वाघा बॉर्डरमार्गे भारतामध्ये प्रवेश केला. त्यानंतर हिमाचल, पंजाब, दिल्ली, राजस्थान, गुजरात, मुंबई, पुणेमार्गे वाई गाठत असीम वाई शहरात पोहोचला.

असीम नोकरी करत असताना पगारातून जमा केलेल्या रकमेतून त्याने आपली जन्मभूमी गाठण्याचा निर्णय घेतला. असीमच्या येण्याने गावकऱ्यांनीही त्याचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले.

“मी जगातील एकमेव बाईक रायडर असेल ज्याने मंगोलिया क्रॉस केलं. मी आता ही बाईक घरी पाठवणार असून चार चाकी गाडी विकत घेणार आहे. त्यानंतर मी आणि माझी बायको आम्ही साऊथ अमेरिका ते नॉर्थ अमेरिका असा प्रवास चार चाकीने करणार आहे”, असं असमी रणदिवेने सांगितले.