नवीन वर्षात प्रवाशांच्या खिशाला कात्री, रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ?

नवीन वर्षात म्हणजेच 2020 मध्ये सर्वसामान्यांच्या खिश्याला कात्री लागणार आहे. रिक्षा, टॅक्सीची भाडेवाढ (Rikshaw and Taxi rent increase) होण्याची शक्यता आहे.

  • गणेश थोरात, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 19:00 PM, 28 Dec 2019
नवीन वर्षात प्रवाशांच्या खिशाला कात्री, रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ?

मुंबई : नवीन वर्षात म्हणजेच 2020 मध्ये सर्वसामान्यांच्या खिश्याला कात्री लागणार आहे. रिक्षा, टॅक्सीची भाडेवाढ (Rikshaw and Taxi rent increase) होण्याची शक्यता आहे. रिक्षा-टॅक्सीचे भाडे वाढवा अशी मागणी चालक-मालकांकडून होत आहे. भाडेवाढीमुळे नवीन वर्षात प्रवाशी वर्गाला याचा चांगलाच फटका (Rikshaw and Taxi rent increase) बसणार आहे.

गेल्या तीन वर्षांपासून रिक्षा आणि टॅक्सी युनियनकडून वारंवार होणाऱ्या भाडेवाढी संदर्भात बैठका झाल्या. परंतु भाडेवाढ काही केल्या होईना. अखेर येत्या नवीन वर्षात म्हणजेच 2020 मध्ये रिक्षा आणि टॅक्सीचे भाडेवाढ होणार आहे.

सध्या रिक्षाचे दर 18 रुपये मीटर असून ते आता 20 रुपये होणार आहे. तर दुसरीकडे टॅक्सीचे दर 22 रुपयावरून 25 रुपये होणार आहे. म्हणजेच रिक्षाच्या दरात 2 रुपयांनी तर टॅक्सीच्या दरात 3 रुपयांनी दर वाढ होणार आहे.

एकीकडे महागाई आणि दुसरीकडे ही भाडेवाढ जर झाली तर सर्वसामान्यांना परवडणार नसल्याचे सर्वसाधारण नागरिक सांगत आहे. तर दुसरीकडे रेल्वेची देखील भाडे वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य जनता नाराज आहे. आता केंद्रातून मोदी सरकार रेल्वेची भाडेवाढ किती करणार हेच पाहणे गरजेचे आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून भाडेवाढ न झाल्यामुळे रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच ओला-उबेरमुळे हा व्यवसाय मोडकळीस आला आहे. त्यासोबतच बेस्ट बसच्या तिकीट दरात घट झाल्यामुळेही त्याचा फटका रिक्षा आणि टॅक्सीवर बसत आहे. त्यामुळे भाडेवाढ स्थिर असल्यास प्रवाशांना आणि आम्हाला देखील दिलासा मिळेल अशी देखील प्रतिक्रिया रिक्षा आणि टॅक्सी चालक मालक कडून येत आहे.

वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. येत्या नवीन वर्षात म्हणजेच 2020 मध्ये सर्वसामान्यांच्या खिश्याला कात्री लागणार आहे. रिक्षा, टॅक्सी आणि रेल्वेच्या भाडेवाढीत वाढ होणार आहे. त्यामुळे प्रवासी वर्गाला याचा चांगलाच फटका बसणार आहे. या दर वाढीमुळे येत्या नवीन वर्षात सर्वसामान्य जनतेला महागाईचा फटका बसणार आहे.