इंदोरीकर महाराजांबाबत सरकारची भूमिका वाईट नाही : बच्चू कडू

"कीर्तनकार इंदोरीकर महाराज आपल्या कीर्तनातून चांगले उपदेश देतात. त्यांच्याबाबत सरकारची भूमिका वाईट नाही. पण त्यांच्याकडून काही चूक झाली असेल तर ती चूक दुरुस्त करण्याचं काम सरकार करेल", असं स्पष्टीकरण शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिलं (Bacchu Kadu on Indurikar Maharaj statement).

Bacchu Kadu on Indurikar Maharaj statement, इंदोरीकर महाराजांबाबत सरकारची भूमिका वाईट नाही : बच्चू कडू

उस्मानाबाद : “कीर्तनकार इंदोरीकर महाराज आपल्या कीर्तनातून चांगले उपदेश देतात. त्यांच्याबाबत सरकारची भूमिका वाईट नाही. पण त्यांच्याकडून काही चूक झाली असेल तर ती चूक दुरुस्त करण्याचं काम सरकार करेल”, असं स्पष्टीकरण शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिलं (Bacchu Kadu on Indurikar Maharaj statement). बच्चू कडू यांनी उस्मानाबादमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी इंदोरीकर महाराजांच्या सम-विषम तिथीबाबतच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.

“कायदा हा सर्वांसाठी सारखा आहे. मग बच्चू कडू असो किंवा दुसरं कुणी असूद्या. महाराजांच्या दोन तासांच्या कीर्तनामध्ये एखादा शब्द चुकीचा निघाला असेल आणि कुणी त्याची तक्रार करत असेल तर हा विषय गंभीर आहे (Bacchu Kadu on Indurikar Maharaj statement)”, असं बच्चू कडू म्हणाले.

“इंदोरीकर महाराजांचा त्या वक्तव्यामागे उद्देश काय होता? हे तपासणंदेखील गरजेचं आहे. नोटीस देण्याचा अर्थ गुन्हा दाखल करणं असा होत नाही. कायदेशीर कारवाई होईल. इंदोरीकर महाराज आपल्या कीर्तनातून चांगले उपदेश देतात. त्याबद्दल सरकारची भूमिका वाईट नाही. पण त्यांच्याकडून काही चूक झाली असेल तर ती चूक दुरुस्त करण्याचं काम सरकार करेल”, असंदेखील बच्चू कडू म्हणाले.

प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्याविरोधात गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे (PCPNDT ACT on Nivrutti Maharaj Indurikar ). त्यांच्यावर आपल्या कीर्तनात मुलगा प्राप्तीसाठीच्या उपायांवर ‘ऑड-इव्हन’चं वक्तव्यं केल्याचा आरोप आहे. याविरोधात पीसीपीएनडीटी सल्लागार समितीने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत इंदोरीकर यांना नोटीसही पाठवण्यात आली आहे. यामुळे इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

इंदोरीकर महाराजांचा शिवजयंतीनिमित्त खास सल्ला, मोशीत जंगी मिरवणूक

इंदोरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता

राज्य सरकारच्या अकलेची कीव, भाजप आमदाराचा इंदोरीकर महाराजांना पाठिंबा

आखाडा : सम-विषम तारखेवर लिंग कसं ठरतं? लोकांना हसवणारे इंदोरीकर महाराज अडचणीत

इंदोरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता

इंदोरीकर महाराजांचा वाढदिवस सोहळा, सेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसचे नेते एकाच रथात

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *