महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा राज्यपाल-भाजपचा डाव, पण आम्ही तो यशस्वी होऊ देणार नाही : बच्चू कडू

आघाडीत बिघाडी करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाजप आणि राज्यपालांची खेळी आहे, असा गंभीर आरोप राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला आहे.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा राज्यपाल-भाजपचा डाव, पण आम्ही तो यशस्वी होऊ देणार नाही : बच्चू कडू
Follow us
| Updated on: Oct 18, 2020 | 7:27 PM

अमरावती : आघाडीत बिघाडी करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाजप आणि राज्यपालांची खेळी आहे, असा गंभीर आरोप राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला आहे. मात्र भाजप आणि राज्यपालांची राष्ट्रपती राजवटीची खेळी आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. (Bachhu Kadu Serius Alligation Bjp And Governor Bhagatsinh Koshyari)

भाजप आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आघाडी सरकारमध्ये बिघाडी करु पाहतायत. तसंच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंबंधीची कारस्थाने ते करत आहेत. मात्र त्यांचा हा डाव आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असं बच्चू कडू म्हणाले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राचाही त्यांनी निषेध केला. मुख्यमंत्र्याच्या हिंदुत्वावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बोट ठेवलं होतं. त्यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, पत्रातील भाषा पाहता ती असंवैधानिक होती. तसंच राज्यपालांच्या त्या वक्तव्याची तपासणी होणे गरजेचं असल्याचं मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलं.

दुसरीकडे राज्यातील मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी भाजप आक्रमक झालेलं असताना बच्चू कडू यांनी याच मुद्द्यावरून भाजपला सुनावलं. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु असताना तसंच कोरोना वाढण्याचा धोका असताना विरोधी पक्ष लोकांचा जीव धोक्यात टाकणारी अशी मागणी का करतोय?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

बच्चू कडू म्हणाले, “विरोधी पक्ष जरी धार्मिकस्थळं उघडण्याची मागणी करत असला तरी ही वेळ मंदिर मज्जिद उघडण्याची नसून हॉस्पिटल शाळा-कॉलेज कसे उघडता येईल त्याच्याकडे जास्त लक्ष देण्याची आहे”.

(Bachhu Kadu Serius Alligation on Bjp And Governor Bhagatsinh Koshyari)

संबंधित बातम्या

राज्यातील मंदिरे सुरु करण्यासाठी भाजपचं ‘उपोषणास्त्र’; शिर्डी, सोलापूर, सांगली, कोल्हापुरात भाजपचे आंदोलन

भाजपने माणसातला देव ओळखला नाही, ‘मंदिरं उघडा’ आंदोलनावरुन विजय वडेट्टीवारांची टीका

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.