“बाळासाहेब म्हणाले होते, तर मला त्यांचा अभिमान आहे,” राज ठाकरे यांनी सांगितला बाबरी मशिदीचा ‘तो’ किस्सा

गोविंद हटवार, Tv9 मराठी

Updated on: Jan 23, 2023 | 9:56 PM

बाबरी मशीद पडली. याची जबाबदारी घेणे किती मोठी गोष्ट होती. पण, असे अनेक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर घडले आहेत. बाळासाहेब ठाकरे जेवढे कठोर होते, कडवट होते तेवढेच मुलायम होते.

बाळासाहेब म्हणाले होते, तर मला त्यांचा अभिमान आहे, राज ठाकरे यांनी सांगितला बाबरी मशिदीचा 'तो' किस्सा

मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण सभागृहात करण्यात आलं. यावेळी बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बाळासाहेबांशी संबंधित काही किस्से सांगितले. राज ठाकरे म्हणाले, दुपारची वेळ होती. बाबरी मशीद पडली होती. तेव्हा टेलिव्हिजनवर असं नव्हतं. पडली, पडली, पडली. मागच्या एका आंदोलनात आमची गाडी कुणीतरी उडवली. ते खूपदा दाखविलं गेलं होतं. बाबरी मशीद पडली, हे त्यावेळी संध्याकाळच्या बातम्यांमध्ये दाखविलं जात असं. त्यावेळी बाबरी मशीद पडली, हे कळलं होतं. दीड ते दोन तासानंतर एका पत्रकाराचा फोन आला. त्यांनी बाळासाहेब यांना प्रश्न विचारला.

भाजपचे नेते म्हणतात की, हे काही आम्ही केलेलं नाही. ते कदाचित शिवसैनिकांनी केली असेल. तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते, ते शिवसैनिक असतील, तर मला त्यांचा अभिमान वाटतो. त्यावेळी बाबरी मशीद पडली. याची जबाबदारी घेणे किती मोठी गोष्ट होती. पण, असे अनेक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर घडले आहेत. बाळासाहेब ठाकरे जेवढे कठोर होते, कडवट होते तेवढेच मुलायम होते. तेवढेच साधे होते. असंही राज ठाकरे यांनी सांगितलं.

युती अडत होती तेव्हा…

राज ठाकरे म्हणाले, १९९९ साली नारायण राणे मुख्यमंत्री होते. तेव्हाची विधानसभेची निवडणूक झाली. गोपीनाथ मुंडे होते. काही कारणास्तव युती अडत होती. ते काही घडत नव्हते. १५-२० दिवस आमदार खेचन सुरू होतं. दुपारची वेळ. मातोश्रीबाहेर बसलो होतो. गाड्यांचे आवाज ऐकू आले. दोन गाड्या लागल्या. त्यामधून पुण्याचे प्रकाश जावडेकर आणि भाजप-शिवसेनेचे काही जण आहे. ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांना भेटायचं आहे. सरकार बनवायचं आहे. अत्यंत महत्त्वाचे आहेत. आज आपलं सरकार बनवायचं आहे.

…तेव्हा अरे तुरे मध्ये बोलोयचो

सुरेशदादा जैन हे युतीचे मुख्यमंत्री असतील. ते आमदार खेचून आणतील. असा निरोप बाळासाहेबांना द्यायचा होता. तो निरोप घेऊन बाळासाहेबांकडे वर गेलो. काळोख होता. शांतता होती. राज ठाकरे म्हणाले, मी बाळासाहेबांना म्हंटलं. काका उठ. तेव्हा अरे तुरे मध्ये बोलायचो. बाळासाहेबांना निरोप दिला.

सुरेश दादा जैन यांना मुख्यमंत्री करायचं ठरलं. आजच्या आज सरकार बसेल. तेव्हा बाळासाहेब म्हणाले, त्यांना सांग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीचं बसेल. दुसरा नाही. उठले आणि झोपून गेले. मराठीची गोष्टी असेल तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी मराठीसाठी, हिंदुत्वासाठी कडवटपणा घेतला. असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI