परीक्षेच्या काळात मशिदीवरील भोंगे बंद करा : युवासेना

दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या काळात मशिदीवरील भोंगे बंद (Ban on masjid speaker) ठेवा, अशी मागणी नागपूर युवासेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड यांनी केली आहे.

Ban on masjid speaker, परीक्षेच्या काळात मशिदीवरील भोंगे बंद करा : युवासेना

नागपूर : दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या काळात मशिदीवरील भोंगे बंद (Ban on masjid speaker) ठेवा, अशी मागणी नागपूर युवासेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड यांनी केली आहे. युवासेनेचे जिल्हाप्रमुख आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांना निवेदन देत ही मागणी (Ban on masjid speaker) केली.

बारावीची परिक्षा सुरु झाली आहे. त्यामुळे दहावीचे विद्यार्थीही परिक्षेची तयारी करत आहेत. मशिदीवरील भोंग्यामुळे या विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आहे. त्यामुळे परीक्षेच्या काळात मशिदीवरील भोंगे बंद ठेवा, अशी मागणी निवेदनद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

युवासेनेचे कार्यकर्ते या संबंधित गृहमंत्री अनिल देशमुख यांचीही ते भेट घेणार आहेत. या भोंग्यांच्या आवाजामुळे परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांचे नकुसान होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी ही मागणी केली आहे.

“युवा सेना सातत्याने विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी काम करत आहेत. सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत. परीक्षेच्या काळात जेव्हा आमचा विद्यार्थी सकाळी उठून अभ्यास करतो. अभ्यास करताना परिसरात आजूबाजूला मशिदीवर जे भोंगे लागले आहेत. त्या भोंग्याच्या आवाजामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अडचण येते. त्यामुळे त्यांची गुणवत्ता कमी होत आहे. हे भोंगे परीक्षेच्या काळात बंद राहावेत. यामध्ये जाती- धर्माचा कुठेही संबंध नाही. आमचे मुस्लीम विद्यार्थी आहेत त्यांनीही हे भोंगे बंद करायला सांगितले आहेत”, असं युवासेना प्रमुख विक्रम राठोड यांनी सांगितले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *