Baramati Lockdown Extension | बारामतीत 16 जुलैपासून लॉकडाऊन, पहिले चार दिवस अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद

तीन टप्प्यांमध्ये हा लॉकडाऊन केला जाणार असून पहिले चार दिवस अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद राहणार आहेत.

Baramati Lockdown Extension | बारामतीत 16 जुलैपासून लॉकडाऊन, पहिले चार दिवस अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद

बारामती : बारामती शहरात गेल्या काही दिवसांत (Baramati Lockdown Extension) मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात गुरुवारपासून (16 जुलै) लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तीन टप्प्यांमध्ये हा लॉकडाऊन केला जाणार असून पहिले चार दिवस अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली (Baramati Lockdown Extension).

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

बारामतीत आज जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या उपस्थितीत कोरोनासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत 16 जुलै ते 26 जुलै या कालावधीत लॉकडाऊन पाळण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानुसार, हा लॉकडाऊन तीन टप्प्यात राबवला जाणार आहे.

त्यामध्ये पहिले चार दिवस अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवले जाणार असून त्यानंतर परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाणार आहे. या लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी केली जाणार असल्याचं नवलकिशोर राम यांनी सांगितलं (Baramati Lockdown Extension).

बारामतीत अचानकपणे उदभवलेल्या कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज असून यातून शहर लवकरच कोरोनामुक्त होईल, असा विश्वासही नवल किशोर राम यांनी व्यक्त केला. दरम्यान, शहरात लॉकडाऊन होत असला तरी ग्रामीण भागासह एमआयडीसीतील कंपन्यांवर कोणतेही निर्बंध लावले जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

Baramati Lockdown Extension

संबंधित बातम्या :

आठवड्याभराच्या कडकडीत लॉकडाऊननंतर जळगाव पुन्हा सुरु होणार, जिल्हाधिकाऱ्यांकडून नियमावली जारी

Pune Lockdown | पुणे-पिंपरीमध्ये लॉकडाऊन; रस्ते-पेठांचे भाग बंद, सात हजार पोलिस तैनात

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *