आई मतदान करत असताना अजित पवार कक्षात का डोकावले?

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:12 AM, 23 Apr 2019
आई मतदान करत असताना अजित पवार कक्षात का डोकावले?

बारामती: भारतीय लोकशाहीचा सर्वांत मोठा उत्सव असलेली लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया देशभरात सुरु आहे. आज तिसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. महाराष्ट्रातील 14 जागांसाठी आज मतदान होत आहे. यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे.

आजच्या मतदानादरम्यान बारामती लोकसभेतील काटेवाडी मतदान केंद्रावर वादग्रस्त चित्र पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या मातोश्री मतदान करत होत्या. त्यावेळी अजित पवार हे त्यांच्याजवळ जाऊन मतदान कक्षात डोकावताना दिसले. त्यामुळे अजित पवार गोपनियतेचा भंग करत आहेत का असा प्रश्न पडला. पण अजित पवार यांच्या वृद्ध मातोश्रींनी मतदान यंत्र बंद असल्याचं सांगितलं. त्यामुळेच अजित पवार मतदान अधिकाऱ्यांना सांगून तिकडे गेल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. आई वृद्ध असल्याने अजित पवार तातडीने धावल्याचंही सांगितलं जात आहे.

दरम्यान, बारामतीच्या काटेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत अजित पवार यांनी कुटुंबासह मतदान केलं. बारामतीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळेंनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. सुप्रिया सुळे यांच्यासोबत प्रतिभा पवार, रणजीत पवार, शुभांगी पवार यांनी मतदान केलं.

बारामती भाजपने जिंकली, तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन आणि नाही जिंकली, तर त्यांनी निवृत्त व्हावे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

दरम्यान, मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी नागरिक गर्दी करताना दिसत आहे.

संबंधित बातम्या

2014 ला पवार कुटुंबाची धाकधूक वाढवणारे तीन विधानसभा मतदारसंघ  

बारामतीत थेट पवार विरुद्ध फडणवीस लढत, 21 लाख मतदार खासदार ठरवणार!   

‘शरद पवारांनी जनतेला भोपळा दिला, आता त्यांच्या हातातही भोपळाच द्या’