स्त्री भ्रूण हत्येतील दोषी सुदाम मुंडेला जामीन नाकारला, अंबाजोगाई न्यायालयाचा दणका

डॉ. सुदाम मुंडे याने जामीन मिळावा यासाठी विनंती अर्ज केला होता. दरम्यान अंबाजोगाई न्यायालयाने हा अर्ज फेटाळला आहे.

स्त्री भ्रूण हत्येतील दोषी सुदाम मुंडेला जामीन नाकारला, अंबाजोगाई न्यायालयाचा दणका
Follow us
| Updated on: Oct 06, 2020 | 3:39 PM

बीड : देशभर गाजलेल्या बीडमधील स्त्री भ्रूण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. सुदाम मुंडेचा (Sudam Munde Bail Application Rejected) जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. अंबाजोगाई न्यायालयाने सुदाम मुंडेचा जामीन अर्ज फेटाळून लावला (Sudam Munde Bail Application Rejected).

अनधिकृतपणे रुग्णालय सुरु केल्यावरुन सुदाम मुंडेला पुन्हा अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सुरु असून तत्पूर्वी डॉ. सुदाम मुंडे याने जामीन मिळावा यासाठी विनंती अर्ज केला होता. दरम्यान अंबाजोगाई न्यायालयाने हा अर्ज फेटाळला आहे.

शिक्षा भोगून आल्यावर पुन्हा बेकायदेशीर प्रॅक्टिस

डॉ. सुदाम मुंडे याने शिक्षा भोगून आल्यानंतर पुन्हा बेकायदेशीरपणे वैद्यकीय प्रॅक्टिस सुरु केल्याचं गेल्या महिन्यात समोर आलं होतं. बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशाने 6 सप्टेंबरला पहाटे परळीतील मुंडे हॉस्पिटलवर पोलिसांनी छापा टाकला. यात हॉस्पिटलमधील साहित्य जप्त करण्यात आलं. तसेच, पोलिसांनी सुदाम मुंडेला पुन्हा अटक केली. तो डॉक्टर असलेल्या मुलीच्या नावाने स्वतः प्रॅक्टिस करत होता.

डॉ. सुदाम मुंडेची न्यायालयाने वैद्यकीय पदवी कायमस्वरुपी रद्द केली आहे. मात्र, तरीही त्याच्याकडून न्यायालयाचे सर्व आदेश धुडकावून पुन्हा प्रॅक्टिस सुरु होती. गेल्या 6 महिन्यांपासून सुदाम मुंडे बिनधिक्कतपणे प्रॅक्टिस करत होता. या हॉस्पिटलचा परवाना मुंडे याच्या डॉक्टर मुलीच्या नावाने आहे. असं असतानाही सुदाम मुंडे आपल्यावरील बंदीला झुगारुन प्रॅक्टिस करत होता.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

बीड जिल्ह्यातील परळी इथल्या डॉ. सुदाम आणि सरस्वती मुंडे यांच्या मुंडे हॉस्पिटलमध्ये 18 मे 2012 रोजी विजयमाला महादेव पटेकर या महिलेचा गर्भपातादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी आरोपी डॉक्टर दाम्पत्यावर गुन्हा दाखल झाला होता. मात्र दोघेही फरार झाले होते.

यानंतर परळी न्यायालयाने दोघांनाही 3 जुलैपर्यंत कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. अन्यथा सीआरपीसी कायदा 83 नुसार संपत्ती जप्तीची कारवाईचा इशारा दिला होता.

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेनं मुंडे दाम्पत्याचा परवाना कायमचा रद्द केला होता. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी या दाम्पत्याला जामीन मंजूर झाला होता. मात्र सामाजिक संघटनांनी आंदोलनं करुन जामीन रद्द करण्याची मागणी केली होती (Sudam Munde Bail Application Rejected).

यानंतर मुंडे दाम्पत्य स्वत: पोलिसात हजर झालं होतं. त्यांच्यावर खटला चालल्यानंतर 2015 मध्ये कनिष्ठ न्यायालयाने त्यांना 4 वर्षे कैद आणि 80 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर हा खटला जिल्हा न्यायालयात सुरु होता. जिल्हा सत्र न्यायालयाने मुंडे दाम्पत्याला 10 वर्षांची शिक्षा सुनावली.

टीव्ही 9 ने सर्वप्रथम स्त्री भ्रूण हत्येचं प्रकरण चव्हाट्यावर आणलं

2011-12 साली गाजलेल्या अवैध गर्भपात प्रकरणात डॉ. सुदाम मुंडे आणि त्याची पत्नी सरस्वती मुंडे या दोघांना बीड जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवून 10 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. परंतु शिक्षेची काही दिवस शिल्लक असताना मुंडे दाम्पत्याला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. जामिनावर आलेल्या मुंडेने पुन्हा प्रॅक्टिस सुरु केल्याची माहिती समजताच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आरोग्य विभाग आणि पोलिसांनी आज पहाटे छापा मारुन मुंडेला अटक केली. यामुळे राज्यात पुन्हा खळबळ माजली. 2011 साली स्त्री भ्रूण हत्येचं हे प्रकरण टीव्ही 9 नेच सर्वप्रथम चव्हाट्यावर आणलं होतं. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती.

2012 साली विजयमाला पटेकर या महिलेचा गर्भपात डॉ. मुंडे याने केला होता. लिंगनिदान चाचणीत सदर महिलेच्या गर्भात स्त्री जातीचं अर्भक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मुंडे याने गर्भपात केला. मात्र गर्भपातादरम्यान अति रक्तस्त्राव झाल्याने विजयमाला पटेकर या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर हे प्रकरण चव्हाट्यावर आले होते. चौकशीनंतर मुंडे दाम्पत्यावर गुन्हा दाखल होताच हे दोघेही तब्बल दीड महिना फरार होते. देशभर फिरल्यानंतर मुंडे दाम्पत्यानी पोलिसांना शरण आले. पोलिसांनी अटक केल्यावर त्यांच्यावर अंडर ट्रायल खटला सुरू होता. अखेर 2019 मध्ये बीड जिल्हा न्यायालयाने दहा वर्षाची शिक्षा ठोठावली. मात्र मुंडे दाम्पत्यानी आधीच शिक्षा भोगल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन जामीन मंजूर करवून घेतला.

परळीत काही मोजक्या रुग्णालयापैकी एक मुंडे रुग्णालय होते. गेली अनेक वर्षांपासून मुंडे रुग्णालयात गर्भपात सुरू होते. मुंडेंनी त्या काळात गर्भपातासाठी तब्बल तीन हजार 940 च्या जवळपास विक्रीडील या औषधांचा वापर केल्याचं चौकशीत समोर आलं होतं. एवढंच नाही तर गर्भपात केल्यानंतर त्याची व्हिलेवाट लावण्यासाठी अनेक कर्मचारी नोकरीवर ठेवले होते. गर्भपातानंतर भ्रूण स्वतःच्या शेतातील विहिरीत टाकायचा. रुग्णसंख्या वाढल्यानंतर भ्रूण घरात पोसलेल्या दोन कुत्र्यांना देखील खाऊ घालण्याचे क्रूर कृत्य मुंडे करायचा. 2011 साली परळी परिसरातील संगम नदीत 13 भ्रूण आढळल्याचे प्रकरण सर्वप्रथम टीव्ही 9 ने उघडकीस आणले होते. त्यानंतर हे प्रकरण खऱ्या अर्थाने चव्हाट्यावर आले होते.

Sudam Munde Bail Application Rejected

संबंधित बातम्या :

स्त्रीभ्रूण हत्येचा कारखाना, बीडच्या सुदाम मुंडे दाम्पत्याला 10 वर्षांची शिक्षा

सुदाम मुंडेचा पॅरोल तातडीने रद्द करा आणि तुरुंगात टाका, सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडेंची मागणी

Non Stop LIVE Update
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.