बड्या मराठा महिला नेत्याचा शरद पवार गटात प्रवेश, मराठा कार्ड चालणार? पवारांच्या खेळीने बीडचं राजकारण तापणार

विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे आणखी एका बड्या नेत्यानं राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे.

बड्या मराठा महिला नेत्याचा शरद पवार गटात प्रवेश, मराठा कार्ड चालणार? पवारांच्या खेळीने बीडचं राजकारण तापणार
Follow us
| Updated on: Oct 20, 2024 | 6:08 PM

विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे शिवसंग्राम संघटनेच्या अध्यक्षा ज्योती मेटे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये मेटे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. मेटे या बीड विधानसभेसाठी इच्छूक आहेत. या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. समाजकारणाला राजकारणाची जोड देण्यासाठी पक्षात प्रवेश केल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे. बीड विधानसभेसाठी पक्षाकडे प्रस्ताव पाठवल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाल्या मेटे?  

मी शिवसंग्राम संघटनेची अध्यक्ष आहे. शिवसंग्राम ही एक सामाजिक संघटना आहे. मी आज शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. मी बीड विधानसभेसाठी इच्छूक आहे. त्यामुळे यासंदर्भात पक्ष निर्णय घेईल. समाजकारणाला राजकारणाची जोड देण्यासाठी पक्षात प्रवेश केला, असं ज्योती मेटे यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी जरांगे पाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्याचं टाळलं आहे. जरांगे पाटील काय बोलले ते मला माहिती नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ज्योती मेटे यांनी आता राष्ट्रवादी शरद पवार गटात पक्षप्रवेश केला आहे, त्यांना बीडमधून तिकीट मिळणार का? हे पाहाण महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान ज्योती मेटे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी देखील शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्यावेळी त्यांना तिकीट मिळू शकलं नाही. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं बजरंग सोनवणे यांना तिकिट देण्यात आलं. त्यांनी या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभा केला. त्यानंतर आता ज्योती मेटे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्या विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत, यावेळी तरी त्यांना तिकीट मिळणार का? हे पाहावं लागणार आहे.

शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?.
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?.
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल.
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले...
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले....
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?.
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून...
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून....
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ.
शिवसेनेतील मंत्रिपदासाठी इच्छुक अन् नाराजांसाठी एकनाथ शिंदेंचा तोडगा
शिवसेनेतील मंत्रिपदासाठी इच्छुक अन् नाराजांसाठी एकनाथ शिंदेंचा तोडगा.
'लाडक्या बहिणीं'नो डिसेंबरचा हप्ता हवाय? ही कागदपत्र तुम्ही जोडलीत का?
'लाडक्या बहिणीं'नो डिसेंबरचा हप्ता हवाय? ही कागदपत्र तुम्ही जोडलीत का?.
Bogus Medicines : बोगस गोळ्या-औषधांचा भांडाफोड, खरे मास्टरमाईंड कोण?
Bogus Medicines : बोगस गोळ्या-औषधांचा भांडाफोड, खरे मास्टरमाईंड कोण?.