उपोषण करणारी महिला झाडावर चढली, कामावरून कमी केल्याने 9 दिवसांपासून बीडमध्ये आमरण उपोषण

बीडः बीड नगर पालिकेअंतर्गत सफाई कामगार म्हणून कार्यरत असणार्‍या दोन महिलांना कामावरून कमी करण्यात आले होते. या महिला गेल्या नऊ महिन्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसल्या आहेत. महिलांच्या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतली नाही. आज सकाळी यातील एक महिला समोरील लिंबाच्या झाडावर चढून बसल्याने पोलीस प्रशासनासह महसूल विभागाची चांगलीच धावपळ उडाली होती. लेखी कामावर घ्या, तोपर्यंत उतरणार […]

उपोषण करणारी महिला झाडावर चढली, कामावरून कमी केल्याने 9 दिवसांपासून बीडमध्ये आमरण उपोषण
बीडमध्ये झाडावर चढून महिलेचं आंदोलन
Follow us
| Updated on: Dec 08, 2021 | 6:12 PM

बीडः बीड नगर पालिकेअंतर्गत सफाई कामगार म्हणून कार्यरत असणार्‍या दोन महिलांना कामावरून कमी करण्यात आले होते. या महिला गेल्या नऊ महिन्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसल्या आहेत. महिलांच्या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतली नाही. आज सकाळी यातील एक महिला समोरील लिंबाच्या झाडावर चढून बसल्याने पोलीस प्रशासनासह महसूल विभागाची चांगलीच धावपळ उडाली होती.

लेखी कामावर घ्या, तोपर्यंत उतरणार नाही!

मागील 9 दिवसांपासून सदर महिला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी बसल्या आहेत. आज त्यापैकी एकजण झाडावर चढली.  महिलेस खाली उतरवण्यासाठी पोलीस विनवण्या करत होते. मात्र जोपर्यंत कामावर घेण्याचा लेखी कागद दिला जात नाही तोपर्यंत आपण खाली उतरणार नसल्याचा पवित्रा महिलेने घेतला होता. दुपारी दीड वाजता साईनाथ ठोंबरे यांच्या विनंतीवरून महिला झाडावरून खाली उतरली. उपजिल्हाधिकारी राऊत यांनी सदरील महिलेस लेखी आश्‍वासन दिले. अनिता बचुटे यासह अन्य एक महिलेस कामावरून कमी करण्यात आले. या महिला बीड नगर पालिके अंतर्गत सफाई कामगार म्हणून कार्यरत होत्या. कामावर घ्यावे म्हणून रोजंदारी मजूर सेनेच्या वतीने अनेकवेळा निवेदन देण्यात आले, आंदोलन करण्यात आले मात्र याची दखल घेतली जात नसल्याने या महिला पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसल्या आहेत. यामध्ये अनिता बचुटे, पंचशिला शिनगारे, राजकुमार जोगदंड, भाई गौतम आगळे यांचा समावेश होता. आंदोलनकर्त्यांची दखल जिल्हा प्रशासन घेत नसल्याने आज अनिता बचुटे या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील लिंबाच्या झााडावर चढून बसल्या. या घटनेची माहिती शिवाजीनगर पोलीसांना झाल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून महिलेस खाली उतरण्याची विनंती केली. त्यानंतर ती खाली उतरली.

इतर बातम्या

VIDEO: लष्कराचे हेलिकॉप्टरला कोसळताच भीषण आग, झाडेही कापली; पाहा व्हिडीओंमधून अपघाताची भीषणता

Pik Vima Yojana : पीकांच्या विम्याची प्रीमियम रक्कम कशी ठरवली जाते? प्रत्येक शेतऱ्यासाठी महत्वाची बातमी

Antilia Case : आरोपी नरेश गौरच्या जामिनासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयानं दिला महत्त्वाचा निर्णय

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.