पुतण्यानं काकाला सुनावलं! ‘बगलबच्चांचं ऐकून काका काहीही बोलतात’ संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना टोला

बीड तालुक्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीवरून क्षीरसागर काका-पुतणे आमनेसामने उभे ठाकले होते. दहा ग्रामपंचायत पोट-निवडणुकीत 8 जागी राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले असल्याचा दावा आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलाय.

पुतण्यानं काकाला सुनावलं! ‘बगलबच्चांचं ऐकून काका काहीही बोलतात’ संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना टोला
Follow us
| Updated on: Dec 25, 2021 | 11:44 PM

बीड : मराठवाड्यातील बीड तालुक्यात काका-पुतणे पुन्हा एकदा आमनेसामने उभे ठाकले आहेत. राष्ट्रवादी आदार संदीप क्षीरसागर यांनी शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागरांना उद्देशून टोला हाणला. संदीप यांनी ‘काका बगलबच्चांचं ऐकून बालिश वक्तव्य करतात’ असं म्हटलंय. राज्यात आपण अनेकदा काका-पुतण्याचा संघर्ष पाहिला आहे. अनेक काक-पुतण्याच्या जोड्या राजकारण गाजवतानाही पाहिले आहेत.

पुतण्यानं काकांना सुनावलं

बीड तालुक्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीवरून क्षीरसागर काका-पुतणे आमनेसामने उभे ठाकले होते. दहा ग्रामपंचायत पोट-निवडणुकीत 8 जागी राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले असल्याचा दावा आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलाय. हा दावा करतानाच त्यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांना उद्देशून म्हटलंय की, काका मुंबईला राहतात. त्यामुळे स्थानिक परिस्थिती काय आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यांचे बगलबच्चे त्यांना फोनवरुन परिस्थिती सांगतात. बगलबच्छाचे ऐकून ते बालिश वक्तव्य करतात, असं असल्याचा आरोप पुतणे संदीप क्षीरसागर यांनी केलाय.

शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत सेनेचे वर्चस्व असल्याचा दावा केला होता. काकांच्या दाव्यानंतर आमदार संदीप क्षीरसागरांकडून नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार देखील करण्यात आला. आता पुतणे संदीप क्षीरसागर यांना काका जयदत्त क्षीरसागर काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचंय.

Temperature Update : राज्यभर थंडीचा कडाका वाढला; मुंबईसह सर्वत्र पारा घसरला

Mumbai | नाताळदिनी मुंबईत शून्य कोविड बळी, डिसेंबर महिन्यात सहाव्यांदा असं घडतंय!

लसीचा बूस्टर डोस देण्याच्या पंतप्रधानांच्या घोषणेचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

Non Stop LIVE Update
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.